कृषी विभाग
कोपरगावातील ते मका खरेदी बंद,सुरु करण्याची मागणी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाविकास आघाडी सरकारने शासकीय दराने शासनाने मका खरेदी करण्याचा निर्णय घेवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मका खरेदी केंद्र सुरु केले होते,मात्र सर्व मका उत्पादक शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यापूर्वीच हि मका खरेदी केंद्र बंद करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून हे मका खरेदी केंद्र पुन्हा सुरु करावे अशी मागणी कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ यांचेकडे नुकतीच केली आहे.
चालू हंगामात समाधानकारक पर्जन्य व वाढती मागणी उत्पन्न वाढले तर दुसरीकडे मकाचे बाजारभाव पडले होते.या चिंतेत सापडलेल्या मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने शासकीय दराने मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.त्यामुळे शेतकऱ्यांना मकाचे योग्य दर मिळत होते.मात्र शासनाकडून १६ डिसेंबर रोजी अचानक हि मका खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी चिंताक्रांत बनला आहे.
शासनाने जिल्हा पणन महासंघास चालू आर्थिक वर्षांसाठी दिलेले मका खरेदीचे उद्दिष्ट पुर्ण झाल्यामुळे कोपरंगावसह राज्यातील शासकीय मका खरेदी बंद करण्यात आल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांत मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे.मका पिकांसह भरड धान्य खरेदी शासनाने बंद केली आहे.त्यामुळे मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची मका खरेदी होईलच या विषयी खात्री देता येणार नाही असे महाराष्ट्र स्टेट कॉ-ऑपरेटिव्ह फेडरेशनने कळवले आहे.त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.या विभागाने मका खरेदीचे उद्दिष्टे पूर्ण झाल्याची आरोळी ठोकल्याने हा मोठा पेच उभा राहिला आहे.खुल्या बाजारात हमी भाव मिळण्याची कुठलीही खात्री नसल्याने शेतकऱ्यांत मोठी नाराजी निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर आ.काळे यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे.
आ.आशुतोष काळे यांनी बुधवार (दि.६) रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ यांची भेट घेऊन कोपरगाव मतदारसंघात सुरु करण्यात आलेले शासकीय मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे अशी मागणी केली आहे.चालू हंगामात समाधानकारक पर्जन्य व वाढती मागणी या मुळे सर्वच पिकांबरोबरच मका पिकाचे उत्पादन वाढले आहे.त्याचबरोबर मका पिकाचे उत्पन्न वाढल्यामुळे दुसरीकडे मकाचे बाजारभाव पडले होते.अशा वेळी चिंतेत सापडलेल्या मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने शासकीय दराने मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.त्यामुळे शेतकऱ्यांना मकाचे योग्य दर मिळत होते.मात्र शासनाकडून १६ डिसेंबर रोजी अचानक हि मका खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहेत. मात्र आजही अनेक शेतकऱ्यांची मका विक्री करणे अद्याप बाकी असून मका खरेदी केंद्र बंद केल्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.त्यासाठी बंद करण्यात आलेली मका खरेदी केंद्र पुन्हा सुरु करावे.तसेच दिनांक १६ डिसेंबर २०२० रोजी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी केलेल्या मका उत्पादनाची विक्री नोंद व्हावी.मका खरेदीचे शासन पोर्टल बंद झाल्याने ७ शेतकऱ्यांची ३ लाख ३५ हजार ७७५ रुपये खरेदीची विक्री नोंद झालेली नसून सदर नोंद करण्यात यावी अशी मागणी ना. छगन भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात आ.काळे यांनी शेवटी केली आहे.