कृषी विभाग
कोपरगाव येथे…या दुकानाचे उद्घाटन !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील अश्वमेध ॲग्रो मार्टचे उद्घाटन कोपरगाव बेट येथील परमपूज्य रमेशगिरी महाराज आणि विधान परिषद सदस्य व कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष कैलास ठोळे हे होते.

“अमेरिकेतील काही शेतकरी योग्य उत्पादन प्रणालींच्या साहाय्याने मक्याचे सुमारे २०० क्विंटल उत्पादन घेत असून भारतात सिंचन,फर्टिगेशन आणि पीक व्यवस्थापनाच्या प्रभावी वापरातून ११७ क्विंटल उत्पादन मिळवले आहे” -डॉ.बालकृष्ण जडे,कृषी तज्ञ.
या सोहळ्यास सहकार,कृषी,औद्योगिक,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.यामध्ये डॉ.बालकृष्ण जडे,डॉ.सी.डी.देवकर,सहकार महर्षि कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे,माजी जिल्हा परिषद सदस्य केशव भवर,राजेंद्र शिंदे,रंजना आढाव,उद्योजक व जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले,कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष पराग संधान,ऑल इंडिया ॲग्रो इनपुट्स असोसिएशनचे खजिनदार आबा भोकरे,रवंदा येथील प्रगतशील शेतकरी पोपटराव भुसे,दिपक कदम,राजू कदम,आबा कदम,रामनाथ वाघचौरे,अश्वमेधचे संचालक डॉ. द्यानेश्वर वाकचौरे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी,उद्योजक आणि शेतकरी उपस्थित होते.



