कृषी विभाग
कृषिमंत्री अॅड.कोकाटे यांना फेलोशिप प्रदान

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कृषी सूक्ष्मजीव उत्पादक आणि शेतकरी असोसिएशन (अम्मा ) यांचे वतीने राज्याचे कृषी मंत्री अॅड.माणिकराव कोकाटे यांना त्यांचे निवासस्थानी एका औपचारिक बैठकीत प्रतिष्ठित फेलोशिप प्रदान केली असल्याची माहिती अम्माचे अध्यक्ष डॉ.द्यानेश्वर वाघचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

अॅड.कोकाटे यांना प्रदान केलेली फेलोशिप शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या अपार योगदानाचा आणि महाराष्ट्र व भारतातील जैविक शेतीच्या विकासासाठी त्यांच्या निरंतर पाठिंब्याचा गौरव असल्याचे डॉ.वाघचौरे यांनी म्हटले आहे.
या बैठकीत अम्मा असोसिएशनने भारतातील शेतकऱ्यांसाठी चालू असलेल्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली आहे.कृषी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या धोरणानुसार जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अम्मा असोसिएशनचे सक्रिय योगदानाबद्दल माहिती दिली आहे .
अम्मा असोसिएशनने नऊ बायोपेस्टिसाइड्स केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIB&RC),फरीदाबाद येथे नोंदवले असल्याची माहिती दिली,जे भारतात बायोपेस्टिसाइड्सच्या प्रोत्साहनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे .
अॅड.कोकाटे यांना प्रदान केलेली फेलोशिप शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या अपार योगदानाचा आणि महाराष्ट्र व भारतातील जैविक शेतीच्या विकासासाठी त्यांच्या निरंतर पाठिंब्याचा गौरव आहे.
अम्मा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे,उपाध्यक्ष डॉ.रामनाथ जगताप,सचिव डॉ.प्रशांत धारणकर आणि कार्यकारी समितीने शेतकऱ्यांना सशक्त बनवण्यासाठी, कृषी तंत्रज्ञानात नवकल्पना आणण्यासाठी आणि पर्यावरणीय शाश्वततेची खात्री करण्यासाठी सरकार आणि उद्योग सहकाऱ्यांसोबत पुढे काम करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.