कृषी विभाग
…या राज्याची १९ हजार कोटीची कर्ज माफी,नगर जिल्ह्यात अभिनंदन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आगामी दि.०९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या क्रांतीदिनी कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी अ.नगर जिल्हा शेतकरी संघटनेने श्रीरामपूर येथील शेतकरी संघटनेच्या कार्यालयात राज्य उपाध्यक्ष अॅड.अजित काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक मोठ्या उत्साहात पार पडली असून या बैठकीत तेलंगणाच्या शेतकऱ्यांच्या १९ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफी बाबत अभिनंदन ठराव मंजूर केला आहे.
“शेतकरी संघटनेच्या सर्व मागण्या बी.आर.एस.पक्षाच्या अजेंठ्यावर व जाहीरनाम्यात असणार आहे.तसेच आज तेलंगणांत या बाबत अमंलबजावणी चालू आहे त्यामुळे शेतकरी संघटना व बी.आर.एस.यांची राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुर्दैवी आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने काय भूमिका व उपाय योजना असणार आहे हे इस्लामपूर मधील कार्यक्रमात घोषित होणार आहे”-अड्.अजित काळे,प्रदेश उपाध्यक्ष,शेतकरी संघटना.
तेलंगण राज्याच्या निर्मितीचे शिल्पकार के.चंद्रशेखर राव यांनी राज्याचा दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम करतानाच कृषी विकासाच्या अनेक योजना राबवून त्यांनी ‘शेतकऱ्यांचा त्राता’ अशी प्रतिमा निर्माण केली आहे.त्या आधारे तेलंगणा राष्ट्र विकास आघाडी हे पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र विकास आघाडी (बी.आर.एस.) असे नामकरण करून देशभर प्रभाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने तेलंगणाच्या उत्तरेस असलेल्या महाराष्ट्राकडे विशेष लक्ष दिले असून त्यांनी आता सिफाचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांना आपल्या बाजूने वळवले आहे.त्यासाठी आगामी क्रांतिदिनी ते जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.त्यासाठी नुकतीच नगर जिल्हा शेतकरी संघटनेने त्यासभेला जाण्यासाठी एक बैठक श्रीरामपूर येथे आयोजित केली होती.त्यावेळी हा ठराव पास केला आहे.
सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,उपजिल्हा अध्यक्ष हरिभाऊ तुवर,जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे, अ.नगर युवा आघाडी अध्यक्ष बच्चू मोडवे,पशुवैद्यकीय शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब अदिक,रामदास पाटील धुमाळ विचार मंचचे अमृत धुमाळ,श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप,नेवासा तालुका अध्यक्ष त्रिंबक भदगले,राहाता तालुका अध्यक्ष योगेश मोरे, कर्जत तालुका अध्यक्ष रंनजीत सूल,ज्येष्ठ मार्गदर्शक सुदामराव औताडे सी.वाय.पवार,विश्वनाथ गवारे,श्रीरामपूर युवा आघाडीचे शरद आसने,आप्पासाहेब आदिक,साहेबराव चोरमल अॅड.सर्जेराव घोडे,अॅड.कापसे,जिल्हा संघटक,भास्कर तुवर,नेवासा युवा आघाडीचे डॉ.रोहित कुलकर्णी,देवा पाटील कोकणे,विष्णुपंत खंडागळे,गोविंद वाघ,माळेवाडी सोसायटीचे अध्यक्ष संजय वमणे,कैलास पवार,कडू पाटील पवार,नारायण पवार,इंद्रभान चोरमल,बबन उघडे,सचिन कालंगडे,गोरख गवारे आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रसंगी अॅड.काळे म्हणाले की,”आपण गेल्या सात आठ महिन्यापासून के.चंद्रशेखरराव मुख्यमंत्री तेलंगणा,बी.आर.एस महाराष्ट्राचे प्रमुख शंकरराव धोडगे पाटील व प्रभारी बी.जे.देशमुख यांच्याशी तीन ते चार वेळा बैठका घेतल्याचे सांगून त्यात सिफाचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांचेसह मान्यवरांचे शेतकरी हितावर विचार मंथन झाले आहे.शेतकरी संघटनेच्या सर्व मागण्या बी.आर.एस.पक्षाच्या अजेंठ्यावर व जाहीरनाम्यात असणार आहे.तसेच आज तेलंगणांत या बाबद अमंलबजावणी चालू आहे त्यामुळे शेतकरी संघटना व बी.आर.एस.यांची राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुर्दैवी आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने काय भूमिका व उपाय योजना असणार आहे हे इस्लामपूर मधील कार्यक्रमात घोषित होणार असल्याचे अॅड. काळे यांनी शेवटी सांगितले आहे.