शैक्षणिक
आत्मविश्वासाच्या बळावर ध्येय प्राप्त करा-आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास,ध्येय,चिकाटी व परिश्रम आदी गुणांचा वापर करून यश संपादन करावे असे आवाहन सी.एम.ए.आरिफ खान मंसूरी यांनी कोपरगावात एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
सदर प्रसंगी सीएमए मोनिका भंडारी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना,”आय.सी.एम.ए.आय.या कोर्स संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.तर कोपरगाव येथील कर सल्लागार नितीन डोंगरे यांनी कर क्षेत्रातील व्यावसायिक संधी यावर मार्गदर्शन केले आहे.
कोपरगाव शहरांतील कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे.सोमय्या महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व वाणिज्य मंडळच्या वतीने कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट करिअर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.या सत्राचे उद्घाटन इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट ऑफ इंडिया (आय.सी.एम.ए.आय.) नाशिक चाप्टरचे प्रमुख सी.एम.ए.आरिफ खान मंसूरी यांच्या हस्ते करणात आले त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी समन्वयक योगेश कातकडे,सी.एम.ए.मोनिका भंडारी,कोपरगाव येथील कर सल्लागार नितीन डोंगरे,सी.एम.ए.अमोल देशमुख,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग या विषयातील नोकरीच्या विविध संधी तसेच सीएमए कोर्स करण्यासाठी प्रवेश प्रक्रिया,अभ्यासक्रम व महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
सदर प्रसंगी अध्यक्षीय समारोपात प्रा.डॉ.संतोष पगारे यांनी वाणिज्य मंडळाच्या वतीने वर्षभर राबवित असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देतांनाच आयोजित कार्यक्रमाचा उद्देश्य स्पष्ट केला आहे.
सदर कार्यक्रम यशस्वीसाठी प्रो.(डॉ) एस.एल.अरगडे,प्रा.अजित धनवटे,प्रा.सोनाली आव्हाड,प्रा.स्वागत रणधीर यांनी प्रयत्न केले.या मार्गदर्शन सत्रासाठी वाणिज्य शाखेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रवींद्र जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.मुकेश माळवदे यांनी मानले आहे.