जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
संपादकीय

“नायक नही…,खलनायक हुं मै…”

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)


   निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुसऱ्या आवर्तनाचे पाणी सिन्नर व कोपरगाव तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना नदी मार्गाने मिळावे या मागणीसाठी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर नुकतेच.’रास्ता रोको’ आंदोलन करणाऱ्या सुमारे १०० आंदोलक शेतकऱ्यांविरोधात राजकीय आकसातून सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असतानाही बहादरपूर,शहापूरसह,कोऱ्हाळे,वाळकी आदी गावे अद्याप वंचित  ठेवली दुसरीकडे गोदावरीच्या लाभक्षेत्रात पाणी गेल्याचे संतापजनक वास्तव उघड झाले आहे.त्यामुळे राजकीय व्यवस्थेचा निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने निषेध व्यक्त केला आहे.

  

निळवंडे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील गावांना निळवंडे कालवा कृती समितीने वारंवार लेखी मागणी करूनही अद्याप हक्काचे बिगरसिंचन (पिण्याचे) पाणी आरक्षण या नेत्यांनी मिळून दिलेले नाही.तरीही दुष्काळी भागातील काही विघ्नसंतोषी मंडळी दुर्दैवाने या नेत्यांची तळी उचलताना दिसत आहे.त्यांच्या मांडीवर जाऊन बसण्याआधी…या आरक्षणांचे बोलले असते तर दुष्काळी जनतेला हायसे वाटले असते मात्र या दलालांना त्यांचे काही देणे घेणे नाही हेच खरे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते नानासाहेब जवरे व विक्रांत रु.काले यांनीं उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर खंडपीठात शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या सहकार्याने जनहित याचिका (क्रं.१३३/२०१६) दाखल करून हा प्रश्न मार्गी लावला आहे.डाव्या कालव्यांची दुसरी चाचणी गत सव्वा दोन महिन्यापासून सुरु आहे.मात्र उजवा कालवा अद्याप धूळखात पडून आहे.त्याचे वन विभागाचे भूसंपादन नुकतेच माजी खा.प्रसाद तनपुरे व निळवंडे कालवा कृती समितीच्या माध्यमातून पूर्ण केले आहे.(त्याचे श्रेय आता कर्डीले यांनी पळविण्यास सुरु केले आहे) गत दोन वर्षात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी १०५६ कोटींचा निधी दिला,प्रारंभी माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिल्लीतील केंद्रीय जल आयोगाकडून १७ पैकी १४ मान्यता मिळवून दिल्या आहेत.भाजपचे तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी समितीच्या पाठपुराव्याने त्या खालोखाल निधी दिला आहे त्यात हि मंडळी स्रेयवादात कोठेही दिसत नाही.त्यातच वर्तमानात मोठा दुष्काळ आहे.शेतकऱ्यांना रब्बी पिकांना व पिण्यास पाणी शिल्लक नाही.चारा पिकांना पाणी उपलब्ध नाही.त्यामुळे या भागात गंभीर दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.दुसऱ्या आवर्तनात किमान बहादरपूर,जवळके,धोंडेवाडी,शहापूर,बहादराबाद,शहापूर,सायाळे,राहाता तालुक्यातील वाळकी,कोऱ्हाळे आदी खालील भागात निळवंडेचे चाचणीचे पाणी सोडलेले नाही.

 

बहादरपूर येथील शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून सुमारे १३ लाख रुपये खर्चून नदी जोड चर खोदला असून त्यात अद्याप एक पाण्याचा थेंब गेलेला नाही.त्यांच्यावर आता तोंड बडविण्याचा अनास्था प्रसंग ओढवला आहे.या शिवाय अद्याप या लढ्यात निळवंडे कालवा कृती समितीच्या माध्यमातून योगदान देणारी गावे व कार्यकर्ते,शेतकरी पिण्याच्या पाण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले गेले आहे.

बहादरपूर येथील शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून सुमारे १३ लाख रुपये खर्चून नदी जोड चर खोदला असून त्यात अद्याप एक पाण्याचा थेंब गेलेला नाही.त्यांच्यावर आता तोंड बडविण्याचा अनास्था प्रसंग ओढवला आहे.या शिवाय अद्याप या लढ्यात निळवंडे कालवा कृती समितीच्या माध्यमातून योगदान देणारी गावे व कार्यकर्ते,शेतकरी पिण्याच्या पाण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले गेले आहे.त्यामुळे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी समृद्धी वरील आंदोलनानंतर या शेतकऱ्यांना व कार्यकर्त्याना अ.नगर येथील जलसंपदा विभागाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात दि.१४ डिसेंबर रोजी सकाळी बैठक बोलावली होती.सदर बैठकीत सुमारे पाच तास मोठा काथ्याकूट करण्यात येऊनही थेट आश्वासन दिले नाही.त्यांना पुन्हा एकदा जलसंपदा विभागाच्या घुलेवाडी येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात तो निर्णयाचा चेंडू टोलवला होता.त्यासाठी दि.१९ डिसेंबर रोजी दुपारी ०३ वाजता बैठक बोलावून वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या आदेशाबरहुकूम वेळ मारून नेण्याचा कट आखला गेला होता.व त्याची अंमलबजावणी सोयीस्कर केली गेली आहे.त्यांना जलसंपदा विभागाच्या अधिकांऱ्यानी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे नूकसानीकडे दाखवून आपली बोटे सोडवून घेतली आहे.त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे.वास्तव मात्र तसे नाही.

निळवंडे धरणाचा डावा कालवा छायाचित्र.

उजव्या कालव्याच्या आड येणारे वन विभागाचे भूसंपादन नुकतेच माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी निळवंडे कालवा कृती समितीच्या माध्यमातून पूर्ण केले आहे.(त्याचे श्रेय आता कर्डीले यांनी पळविण्यास सुरु केले आहे) गत दोन वर्षात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी १०५६ कोटींचा निधी दिला,भाजपचे तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी समितीच्या पाठपुराव्याने त्या खालोखाल निधी दिला आहे.प्रारंभी माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिल्लीतील केंद्रीय जल आयोगाकडून १७ पैकी १४ मान्यता मिळवून दिल्या आहेत.त्यात हि मंडळी स्रेयवादात कोठेही दिसत नाही.

आगामी काळात लोकसभा,विधानसभा,नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समित्यांच्या निवडणुका आल्या असल्याने सर्वच नेत्यांना आपल्या मत पेट्यांची आठवण होऊन त्यांना नेहमीप्रमाणे निळवंडे प्रकल्प आठवला आहे.व आगामी निवडणुका पाहून जे आवर्तन जवळपास सव्वा दोन महिने सुरु ठेवले होते.आता तर कोणी-कोणी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत आहे.तर कोणी लोकसभेत लक्षवेधी करून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यात मश्गुल आहे.गेली दहा वर्ष पेपरात जाहिराती देऊनही न सापडणाऱ्या लोकप्रतिनिधींना निळवंडेची उबळ आली आहे.व पश्चिम घाटमाथ्याचे पाणी दिवसाढवळ्या दिसू लागले आहे.’जलपुरुष’,’जलनायक’,’जलदुत’,तर उत्तर अ.नगर जिल्ह्यात कमी नाही वडगाव पान,तळेगाव दिघे,निळवंडे,संगमनेर आदी ठिकाणी त्यांच्या प्रतिमा गत दोन वर्षापासून चमकताना दिसत आहे.राजकारण निर्लज्ज होऊन करावे लागते याचे दुसरे उदाहरण सापडणे मुश्किल आहे.यात आपले दुकान काही दशके चालविणाऱ्या समित्या व त्यांची शेखी मिरवणारे काही कार्यकर्ते मिळाले आहेत हे त्याहून आक्रीत.त्यामुळे रस्त्यावर आंदोलन करून व सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाणारी कृती समिती या निळवंडेच्या पाण्यास गेली ५३ वर्ष आडवी आली होती का ? असा उद्दिग्न सवाल नागरिकांनी केला आहे.मग या निर्लज्ज नेत्यांनी या प्रकल्पास पाच दशके आडवे येणाऱ्या खलनायकाची नाव जाहीर केले तर फार बरे होईल.नाही तर निळवंडे कालवा कृती समितीस,’खलनायक’ म्हणून घोषित करावे हे एक वेळ बरे आणि त्यांच्या निवडणुकीसाठी श्रेयस्कर !

आगामी काळात लोकसभा,विधानसभा,नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समित्यांच्या निवडणुका आल्या असल्याने सर्वच नेत्यांना आपल्या मत पेट्यांची आठवण होऊन त्यांना नेहमीप्रमाणे निळवंडे प्रकल्प आठवला आहे.व आगामी निवडणुका पाहून जे आवर्तन जवळपास सव्वा दोन महिने सुरु ठेवले होते.आता तर कोणी-कोणी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत आहे.तर कोणी लोकसभेत लक्षवेधी करून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यात मश्गुल आहे.

ज्यांनी आपल्या दारू कारखान्यांसाठी या पाण्यावर सन-२००८ पासून गेली १३-१४ वर्ष डल्ला मारला आणि ते पळवले,या प्रकल्पाच्या कालव्यात आपल्या शैक्षणीक संस्थांच्या इमारती बांधल्या,आपल्या सग्या सोयऱ्यांना प्लॉट पाडायला सांगून आता-आता पर्यंत भूसंपादन होऊ दिले नाही.कालवा कृती समितीने ते भूसंपादन केल्यावर त्यात कोटयावधी रुपये जिरवले,अकोलेत तालुक्यातील ० ते २८ कि.मी.कालव्याचे काम सुरु होऊ दिले नाही समितीस ते उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर येथील खंडपिठात जाऊन त्यास मे २०१९ ला आदेश मिळवावा लागला.तरीही त्यात सहा महिने कालहरण करण्यास लावून अखेर कालवा कृती समितीस २५० पोलिसांचा लवाजमा घेऊन ते काम सुरु करावे लागले ते ‘टोळभैरव’आता स्वतःला,’जलनायक’,’जलपुरुष’ म्हणवून घेतात,”बोले तैसे चाले….”म्हणवून त्याचे बॅनर झळकावून आपल्याच तोंडाला काळे फासताना दिसत आहे.खरे तर अशा वेळी संत तुकाराम महाराज यांचा
“तुका म्हणे अशा नरा,मोजून हाणाव्या पैजारा”

हा अभंग न आठवला तर नवल ! तो त्यांना चपखल बसत असून या नेत्यांच्या भाटांनी स्वतःत अंतर्मुख होऊन पाहायला हरकत नाही.
यांच्या या नालायकपणा सारखा जगात दुसरा विनोद आढळणार नाही.त्यांचे निवडणुकीत टोकळ्यावर जगलेले भाड्याचे तट्टू त्यांचा उदो…उदो… करत फिरत असून जनतेत संभ्रम करून अद्यापही आपल्या आई-बापांचा बळी देत आहे.याच निर्लज्ज दलालांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या ‘तित्तर’ पक्षाच्या कथेप्रमाणे या दुष्काळी शेतकऱ्यांचा बळी दिला आहे.म्हणून येथील शेतकऱ्यांच्या पुत्रांना अद्याप चाळीशी ओलांडूनही आपल्या विवाहासाठी मुली भेटत नाही,अजूनही शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाही याचे भान या दलालांना अद्याप आलेले नाही हे विशेष ! या झुंडी गेली पन्नास वर्ष पाण्यावर दरोडा टाकणाऱ्या याच (नेते म्हणायला लाज वाटते) टोळभैरवांना घेऊन गावोगाव जात जलपूजन करताना दिसत असून सुज्ञ जन,शेतकरी आणि ग्रामस्थांची मान शरमेने खाली जात आहे.मात्र यांनी कमरेचे सोडून डोक्यास बांधलेले असल्याने त्यांचे त्यांना कोणतेच सोयरसुतक वाटताना दिसत नाही.’दादा’..’भैय्या’…,’साहेब’…,’वहिनी’…करत त्यांच्या समोर गोंडे घोळताना दिसत आहे.काही तर केवळ आपल्या क्षुल्लक पदासाठी त्यांच्या नावाचे पारायण करताना दिसत आहे.या शेपूट हलव्या कार्यकर्त्यानी एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती ही की,”तुमच्या कौतुकाचा “सोहळा” तोपर्यंत साजरा केला जातो,जो पर्यंत तुमची “गरज” असते.निवडणुकीनंतर एकदा का “ती” संपली की,वेळात वेळ काढून “निंदेची खिरापत” घरोघरी वाटली जाते.तुम्ही निवडणूक होऊन जाऊ द्या मग तुमची लायकी या नेत्यांजवळ जाऊन तपासा मग तुम्हाला या लेखाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,पुढारी कसा असावा ? या बाबत म्हणतात,” पुढारी समाजाचा खराखुरा मार्गदर्शक असावा,तो स्वार्थी नसावा,दुस-या पक्षांच्या ओंजळीने पाणी पिणारा नसावा,भाडोत्री कामे करणारा नसावा,तो समाजाची दिशाभूल करणारा नसावा,संकुचित स्वार्थासाठी स्वाभिमान गहाण टाकणारा नसावा ” जो लोकांचे नि:स्वार्थ बुध्दीने काम करतो,सर्वसामान्य माणसांसाठी झटतो,तो खरा नेता-पुढारी होय.नेत्याजवळ
दूर-दृष्टिकोण असावयास हवा.भविष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता त्याच्याजवळ असली पाहिजे.त्याचे चारित्र्य निष्कलंक असावयास हवे.नेत्याला नीट सामाजिक भान असणे गरजेचे आहे.ज्याला समाजाचे नेतृत्व करावयाचे आहे,त्याने समाजाचा मानसशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन्ही अंगांनी चांगला अभ्यास करावयास हवा.
नेत्यांमध्ये वक्तृत्व गुण असला पाहिजे.यातील किती गुण वर्तमान नेत्यांत आहे हे ज्याने त्याने तपासायचे आहे.

  

ज्यांनी आपल्या दारू कारखान्यांसाठी या पाण्यावर सन-२००८ पासून गेली १३-१४ वर्ष डल्ला मारला आणि ते पळवले,या प्रकल्पाच्या कालव्यात आपल्या शैक्षणीक संस्थांच्या इमारती बांधल्या,आपल्या सग्या सोयऱ्यांना प्लॉट पाडायला सांगून आता-आता पर्यंत भूसंपादन होऊ दिले नाही.कालवा कृती समितीने ते भूसंपादन केल्यावर त्यात कोटयावधी रुपये जिरवले,अकोलेत तालुक्यातील ० ते २८ कि.मी.कालव्याचे काम सुरु होऊ दिले नाही ती मंडळी आता,’जलनायक’,’जलदुत’ ठरत आहे तर काही समित्या त्यांना पाठीशी घालून आरत्या ओवाळून ‘कुऱ्हाडीचा दांडा ठरून आपल्याच गोतास काळ होत आहे; याला काय म्हणणार बुवा !

दरम्यान राहाता तालुक्यातील नैऋत्येकडील एका गावात दिल्लीत नेतृत्व करणाऱ्या एक लोक प्रतिनिधी निळवंडे पाण्याच्या आनंदात बेहोष (!) होऊन शेतकऱ्यांत नाचताना आढळल्याने त्याच ठिकाणाहून योगायोगाने एक मंत्री महोदय जात असताना त्यांनी तेथील चित्रण करणाऱ्या छायाचित्रकारास त्याची चलचित्र फित सामाजिक संकेत स्थळावर पाठविण्यास लावली होती.त्यातून काही मिनिटात त्या गावातील पाणी बंद केल्याचे आढळून आले आहे.अखेर सदर मंत्र्यांच्या पायावर तेथील ग्रामस्थानीं विमानतळावर लोटांगण घातल्यावर त्यांना शेवटी पाणी सोडल्याचे आढळून आले आहे.त्यामूळे आगामी काळात येथील जनतेने वारंवार शे-पाचशेच्या नोट आणि दारूवर निवडून दिलेले संस्थानिक कोणत्या पातळीवर जाणार आहे याची चुणूक जनतेला पाहायला मिळाली असल्याचे बोलले जात आहे.अधिकारी आता अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात अतिरिक्त जाणाऱ्या पाण्याचे कारण दाखवून उर्वरित गावांना वाटाण्याच्या अक्षदा दाखवताना दिसत आहे.मग इतके दिवस यांनी आवर्तन कोणाच्या आदेशाने नियमबाह्य सुरु ठेवले होते याचे जाहीर उत्तर देणे गरजेचे बनले आहे.मात्र त्याबाबत हि मंडळी नेत्यांपुढे थेट लोटांगण घालणारी असल्याने ‘च’ कार शब्द बोलणार नाही हे ओघाने आलेच.त्यांची अगतिकता त्यांच्या डोळ्यातून ओघळताना शेतकऱ्यांना थेट दिसून येत आहे.ज्यांनी आपल्या कालखंडात इंग्रजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी निर्माण केलेले पाणी उद्योगांना व बिगर सिंचनास खिरापतीसारखे वाटून दिले,आपल्या सग्या सोयऱ्या-धायऱ्यांना उपसा सिंचन योजना मुक्त हस्ते देऊन टाकल्या त्याच नेत्यांनी नगर-नाशिकच्या वर्तमानात काळ ठरलेले समन्यायी विधेयक (कायदा) निम्म्या रात्री समंत केले त्यांच्या कडून वेगळी अपेक्षा गैर ठरणार हे वेगळे सांगणे न लगे.’त्यांनी आता पश्चिमेचे पाणी’ हा आगामीकाळात मते पेटीबंद करण्यासाठी नवीन निवडणूक फंडा सुरु केला आहे.तरी काही मंडळी या नेत्यांची तळी उचलायला कमी करणार नाही हे पुढे ओघाने आलेच.जो पर्यंत निवडणुकीत पैसा आणि दारू यांचा प्रताप सुरु राहील तो पर्यंत नगर नाशिक जिल्ह्याचे भवितव्य अंधकारमय राहिले तर नवल नाही.’चेहऱ्यावर मुखवटे लावून माणसे जमवता येतात पण ती कमवता येत नाही’ हे या नेत्यांना समजेल तो सुदिन !

निळवंडे कालवा कृती समिती याचिकाकर्ते विक्रांत काले व नानासाहेब जवरे हे उच्च न्यायालयात अड्.अजित काळे यांच्या माध्यमातून निळवंडेच्या लाभक्षेत्राच्या खालील दुष्काळी शेतकऱ्यांचा पाच दशकांचा लढा लढत असताना उत्तर नगर जिल्ह्यातील विविध नेते आणि त्यांच्या सहकारी साखर कारखान्याचे विविध २१ वकील समितीच्या विरुद्ध नेमके काय करत होते ? हे या ‘जलदुत’ आणि ‘जलनायकां’नी एकदा जाहीर करावे म्हणजे यांचे पितळ उघडे होईल व या नेत्यांच्या मागे लाळ घोटणाऱ्या पोटपूजक दुष्काळी कार्यकर्त्याना वास्तव समजण्यास मदत होईल.


त्यामुळे निळवंडे कालवा कृती समितीस ‘खलनायक’ हा १९९३ साली प्रदर्शित झालेला सुभाष घई यांचा हिंदी चित्रपट न आठवला तर नवल.सुभाष घईने निर्माण आणि दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये संजय दत्त,माधुरी दीक्षित व जॅकी श्रॉफ ह्यांच्या आघाडीच्या भूमिका होत्या सदर चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला होता व त्याला अनेक पुरस्कार मिळाले होते.त्यातील प्रमुख भूमिकेत असलेला संजय दत्त हा अभिनेता,”नायक नही…,खलनायक हुं मै…” अशीच काहीशी अवस्था निळवंडे कालवा कृती समितीची या नेत्यांनी आणि त्यांच्या दाव्यांनी करून हास्यास्पद ठेवली आहे असो !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close