गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात महिलेचा खून,आरोपी अटक !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत रेल्वेस्थानक परिसरात रहिवासी असलेल्या दोन अज्ञात भिक्षेकरी यांनी एका अज्ञात महिलेचा (वय-४०) खून केला असल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळी धाव घेतली असून त्या ठिकाणी महिलेचा मृत देह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दखल केला आहे.दरम्यान या प्रकरणी त्यांनी एका संशयित इसम निसार कलाम खान (वय-२९) रा.भागलपुर बिहार यास ताब्यात घेतला आहे.
कोपरगाव-वैजापूर रस्त्यावर लोणारी काँप्लेक्स समोर काही भिक्षेकरी मंडळी बसलेली असताना त्यांच्यात अज्ञात कारणावरून वादविवाद झाला होता.त्याचे पर्यवसान रात्री ११.५२ वाजता सदर महिलेचे डोके सदर व्यापारी संकुलाच्या भीतीवर डोके आपटून मारण्यात झाले आहे.त्यातून सादर महिला गंभीर जखमी झाली असून ती पहाटेच्या सुमारास गतप्राण झाली आहे.याबाबत तेथील सी.सी.टी.व्ही.मध्ये सदर महिलेला ओढून नेताना चलचित्रण झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
कोपरगाव तालुक्यात शिंगणापूर शिवारात रेल्वे स्थानक असल्याने या ठिकाणी अनेक भिक्षेकरी ठाण मांडून असतात.आलेल्या प्रवाशांकडून भिक्षा मागून आपली उपजीविका चालवताना दिसतात.या गावात त्यामुळे बकाल नागरिकांची लोकसंख्या लक्षणीय रित्या वाढली आहे.त्या ठिकाणी त्यांच्यात वेळो वेळी हाणामाऱ्या या नित्याच्या ठरलेल्या आहे.त्यामुळे या ग्रामपंचायत हद्दीतील शांतता भंग पावतांना दिसत आहे.अशीच घटना रात्रीच्या सुमारास घडली असून कोपरगाव-वैजापूर रस्त्यावर लोणारी काँप्लेक्स समोर हि मंडळी बसलेली असताना त्यांच्यात अज्ञात कारणावरून वादविवाद झाला होता.त्याचे पर्यवसान रात्री ११.५२ वाजता सदर महिलेचे डोके सदर व्यापारी संकुलाच्या भीतीवर डोके आपटून मारण्यात झाले आहे.त्यातून सादर महिला गंभीर जखमी झाली असून ती पहाटेच्या सुमारास गतप्राण झाली आहे.याबाबत तेथील सी.सी.टी.व्ही.मध्ये सदर महिलेला ओढून नेताना चलचित्रण झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान सदर महिला जखमी असताना दोघे जण तिच्या जवळ बसून होते अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.मात्र ती गतप्राण झाल्यावर त्यांनी धूम ठोकली आहे.महिलेच्या खुनास पोलीस अधिकारी देसले यांनी दुजोरा दिला आहे.
दरम्यान प्रथम दर्शनी कोपरगाव शहर पोलिसांनी या घटनेतील एक संशयित आरोपीस अटक केली असून त्यास जेरबंद केले आहे.पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहे.त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आपापली दुकाने भीतीने बंद केली आहे.या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले हे आपल्या सहकाऱ्यांसमेत करीत आहे.