जाहिरात-9423439946
महसूल विभाग

शेतजमीन मोजणीची नवीन पद्धतीची घोषणा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

आगामी महिन्यातील ०१ऑगस्ट पासून आता शेतजमीन मोजणी अर्ज करण्यासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही.शेत जमीन मोजणीचे कामकाज ऑनलाईन होणार आहे.अशी माहिती राहाता भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश थोरात यांनी दिली आहे.

भूमिअभिलेख विभाग शेतकऱ्यांची जमीन मोजणीसाठी संबंधित जमीनधारकांना आगावू नोटीसद्वारे कळवून मोजणीची तारीख निश्चित केली जाते.यात साधी मोजणी,तातडीची,अति तातडीची मोजणी असे वेगवेगळे चढे दर त्यासाठी निश्चित आहे.मात्र तरीही सदर मोजणी कधीही वेळेवर झाल्याचे उदाहरण सापडणे मुश्किल मानले जात आहे.अशातच सरकारने नविन पद्धती जाहीर केली आहे.या आधीच सहाशे रुपये ब्रास वाळूचे स्वप्न हे स्वप्नचं असताना आणखी एका नव्या घोषणेची महसूल मंत्र्यांकडून भर पडली आहे.त्याची अमलबजावणी होणार का ? हा खरा प्रश्न आहे.हाही वाळूसारखा हवेचा बुडबुडा ठरणार हे लवकरच समजणार आहे.

सर्व संकल्पितच छायाचित्र.

जमिनीच्या मालकी हक्काबाबतचे वादविवाद मिटविण्यासाठी भूमी अभिलेख व भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जमीन मोजणीसाठी अर्ज करावा लागतो.जमीन मोजणीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार मोजणी फी भरुन त्याची नोंद मोजणी नोंदवहीत घेतली जाते.संबंधित जमीनधारकांना आगावू नोटीसद्वारे कळवून मोजणीची तारीख निश्चित केली जाते.यात साधी मोजणी,तातडीची,अति तातडीची मोजणी असे वेगवेगळे चढे दर त्यासाठी निश्चित आहे.मात्र तरीही सदर मोजणी कधीही वेळेवर झाल्याचे उदाहरण सापडणे मुश्किल मानले जात आहे.अशातच सरकारने नविन पद्धती जाहीर केली आहे.या आधीच सहाशे रुपये ब्रास वाळूचे स्वप्न हे स्वप्नचं असताना आणखी एका नव्या घोषणेची महसूल मंत्र्यांकडून भर पडली आहे.त्याची अमलबजावणी होणार का हा खरा प्रश्न आहे.

महसूल विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,”शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये वारंवार चकरा माराव्या लागत होत्या.महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून ही सर्व प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे.त्यासाठी आता शेतकऱ्यांना भूमी अभिलेख कार्यालयामध्ये चकरा मारण्याची गरज पडणार नाही व मोजणीसाठी सहा महिने प्रतिक्षा करण्याची गरज पडणार नाही.शेतकऱ्यांना सहजा सहजी आपले शेतीचे अचूक नकाशे मिळण्यास मदत होणार आहे.

शेतकऱ्यांना आता जर आपल्या शेतजमिनीची मोजणी करायची असेल तर त्या शेतकऱ्यांनी कार्यालयात न येता ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे व ऑनलाईन अर्ज दाखल केल्यावर त्या शेतकऱ्यांचे शेतजमीन मोजणीचे पैसे बँकेत न जाता ऑनलाईन पद्धतीने भरून शेतकऱ्यांना तात्काळ मोबाईल वर आपल्या शेतीची मोजणीची तारीख मोबाईल संदेशाद्वारे कळविण्यात येईल व पुढील १५ दिवसाच्या आत सदरील जमिनींची मोजणी पूर्ण होऊन संबंधित शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीचा अचूक नकाशा कार्यालयात न येता ऑनलाईन डाऊनलोड करून प्राप्त करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

उपग्रहाद्वारे मोजणी करून मोजणी नकाशामध्ये ‘क्यूआरकोड’च्या मदतीने अक्षांश व रेखांश उपलब्ध करून दिले जाणार आहेत.महसूलमंत्र्यांच्या सूचनेनुसार कार्यालयात ५ नवीन कर्मचाऱ्यांची भरती झाली असून मोजणीसाठी खासगी कंपनीची मदत घेऊन कमीत कमी वेळेत अचूक मोजणी करण्यावर भर दिला जात आहे.शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मोजणी साठी होणारी ससेहोलपट थांबणार असून या योजनेमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असा दावा श्री थोरात यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close