Uncategorized
संवत्सर येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
कोपरगाव(प्रतिनिधी) संवत्सर गावातील क्रांतिसूर्य महात्मा
ज्योतिबा फुले मागासवर्गीय वाचनालयाच्या वतीने नुकतीच साहित्यरत्न
अण्णाभाऊ साठे यांची शताब्धी वर्षानिमित्ताने जयंती कार्यक्रम नुकताच पार
पडला आहे. यावेळी प्रतिमा पूजन व मनोगत डॉ . मयूर तिरमखे , पंडित भारूड
,लक्ष्मण साबळे ,बंडू आचारी , सुदाम साबळे ,विजय काकडे ,बापू तिरमखे
यांनी केले . यावेळी अर्जुन कांबळे ,पंकज चंदनशिव ,मधुकर मैंद ,बाळासाहेब
कांबळे , डी.आर निरगुडे ,आबू आचारी ,बापूराव कांबळे ,गोरख सोळसे आदि
मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्तविक व आभार वाचनालयाचे
अध्यक्ष पंडित भारूड यांनी केले .