जाहिरात-9423439946
कामगार जगत

सहाय्यक पो.नी.बोरसे यांना नांदेडात बढती

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांची नुकतीच नांदेड जिल्ह्यात पोलीस निरीक्षक पदावर बढती झाली आहे.त्यांच्या या बढतीबद्दल अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी आपल्या सेवेच्या प्रारंभी जिल्हा परिषद नाशिक मध्ये पंचायत समिती निफाड येथे परिचर पदावर नियुक्ती झाली होती.एप्रिल २००८ ते डिसेंबर २००८ पर्यंत ते सहकार विभागात सहकार अधिकारी म्हणून नियुक्तीवर होते.उत्तोरोतर त्यांनी स्पर्धा परिक्षेत यश मिळवून यशोशिखर गाठले आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात ऑगष्ट २०१८ मध्ये रुजू झाले होते.त्यांनी कोपरगाव येथे आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.अत्यन्त मितभाषी असूनही त्यांनी अनेक गुन्हेगारांना जेरबंद करण्यात मोलाची भूमिका वठवली होती.या पूर्वी त्यांनी याच पदावर जळगाव जिल्ह्यात पाचोरा,अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव यांचे वाचक,चाळीसगाव येथे ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत होते.त्यांनी दि.०१ जानेवारी २००९ ते डिसेंबर २००९ या दरम्यान महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण घेतले होते.त्या नंतर त्यांची ०१ जानेवारी २०१० पासून ते ऑगष्ट २०१३ पर्यंत चंद्रपूर येथे चंद्रपूर शहर,बल्लार शहा,जिवती,लाठी,आदी ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.त्यांना या पूर्वी विशेष सेवा पदक,आंतरिक सुरक्षा पदकाने गौरवले आहे.त्या नंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक पदावर प्रतिनियुक्तीवर पाठवले होते.

पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी आपल्या सेवेच्या प्रारंभी जिल्हा परिषद नाशिक मध्ये पंचायत समिती निफाड येथे परिचर पदावर नियुक्ती झाली होती.एप्रिल २००८ ते डिसेंबर २००८ पर्यंत ते सहकार विभागात सहकार अधिकारी म्हणून नियुक्तीवर होते.उत्तोरोतर त्यांनी स्पर्धा परिक्षेत यश मिळवून यशोशिखर गाठले आहे.त्यांचे मूळगाव नांदगाव तालुक्यातील साकोरे हे आहे.त्यांच्या बढतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close