गुन्हे विषयक
कैद्यांच्या हाणामाऱ्या,एक जखमी,कोपरगावात चार जणांवर गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या उपकारागृहात असलेल्या काही कैद्यांना त्यांचे नातेवाईक आल्याने भेटण्यास बाहेर काढले असता त्यातील काहींनी मागील वैमनस्य काढण्यासाठी आपआपसात भांडणे करून एकमेकास बेदम मारले असून यातील आरोपी किरण छगन सोनवणे याने आरोपी किरण माधव हजारे यास तेथील टेबलचा पाय मोडून त्याने जोरदार प्रहार केल्याने ‘तो’ त्यात गंभीर जखमी झाला आहे.या प्रकरणी शहर पोलिसानी आपल्या दप्तरी आरोपी दिगंबर हरिचंद्र निकम,किरण सोनवणे,शरद गोटीराम फुलारी व जखमी आरोपी किरण हजारे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान काही महिन्यांपूर्वी काही आरोपींना गांजा व अंमली पदार्थ दिले असल्याची वदंता होती.याबाबत आमच्या प्रतिनिधीने माहिती अधिकारात माहिती मागितली असता ती तुरुंग प्रशासनाने सोयीस्कररित्या टाळली गेली आहे.त्या नंतर अशीच घटना नुकतीच उघडकीस आली त्यात असून यातील काही आरोपीना बाहेर काढले असता त्यातील काही आरोपीनी आपापसात हुज्जत घालण्यास सुरुवात केली होती.त्यातील काही आरोपीनीं मागील वैमनस्य काढण्यासाठी आपआपसात भांडणे करून किरण हजारे यास आरोपी किरण सोनवणे याने बेदम मारले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीत जुने उपकारागृह असून यात ०७ बराकी आहे.यात आरोपीना ठेवण्याची क्षमता केवळ २५-३० आहे मात्र या ठिकाणी बऱ्याच वेळा गंभीर गुंह्यातील ३५-४० आरोपींना ठेवण्यात येते.गत महिन्यात याठिकाणी जवळपास एकूण ९० च्यावर आरोपी जेरबंद असतात यात वेळेनुसार कमी जास्त असतात.त्यात कोपरगाव शहर,तालुका पोलीस ठाणे,शिर्डी,राहाता,लोणी,श्रीरामपूर आदी ठिकाणच्या भा.द.वि.खुनाचे कलम-३०२,खुनाचा प्रयत्न कलम-३०७,दरोडा कलम-३९५,बलात्कार-३७६ आदी गंभीर गुंह्यातील ३०-३५ आरोपींचा समावेश असतो.यात प्रामुख्याने शिर्डी येथील सुरज ठाकरे,यांचेवर गोळीबार केलेला आरोपी किरण हजारे,तनवीर रंगरेज,आकाश लोखंडे,आदीसह शिर्डी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिंगटोन प्रकरणातील सागर शेजवळ खून प्रकरणातील आरोपी सोमनाथ वाडेकर,रामा जाधव,दीपक मांजरे,शोएब शेख,किरण आजबे,विशाल कोते,याशिवाय लोणी येतील पोलीस ठाण्यातील धोकादायक आरोपी शाहरुख सत्तार खान आदींचा समावेश होता.त्यामुळे येथील आरोपी बाबत पोलिस प्रशासनास गंभीरता असावी तितकी असताना दिसत नाही.त्यामुळे बऱ्याच वेळा अनर्थ होताना दिसत आहे.
दरम्यान काही महिन्यांपूर्वी काही आरोपींना गांजा व अंमली पदार्थ दिले असल्याची वदंता होती.याबाबत आमच्या प्रतिनिधीने माहिती अधिकारात माहिती मागितली असता ती तुरुंग प्रशासनाने सोयीस्कररित्या टाळली गेली आहे.त्या नंतर अशीच घटना नुकतीच उघडकीस आली त्यात असून यातील काही आरोपीना बाहेर काढले असता त्यातील काही आरोपीनी आपापसात हुज्जत घालण्यास सुरुवात केली होती.त्यातील काही आरोपीनीं मागील वैमनस्य काढण्यासाठी आपआपसात भांडणे करून एकमेकास बेदम मारले असून यातील आरोपी किरण छगन सोनवणे याने आरोपी किरण माधव हजारे यास तेथील टेबलचा पाय मोडून त्याने जोरदार प्रहार केल्याने तो त्यात गंभीर जखमी झाला आहे.त्यास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकरणी शहर पोलिसानी आपल्या दप्तरी आरोपी दिगंबर हरिचंद्र निकम,किरण सोनवणे,शरद गोटीराम फुलारी व जखमी आरोपी किरण हजारे यांचे विरुद्ध गुन्हा क्रं.२६६/२०२३ भा.द.वि.कलम १६०,३२४,३२३,५०४,५०६ ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,पोलीस नाईक बी.एस.कोरेकर यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचें मार्गदर्शनाखाली पो.ना.कोरेकर करीत आहेत.