धार्मिक
…या ठिकाणी होत होते मृत सैनिक जिवंत !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव बेट येथील ऐतिहासिक गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात त्यांची महत्ती सांगणाऱ्या व संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड लिखित “शुक्र तीर्थ” या पुस्तकाचे ऑडियो बुकचे प्रकाशन कोपरगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.
श्री क्षेत्र कोपरगाव हे भौगोलिक स्थान सकारात्मक उर्जात्मक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे व पवित्र मानले जाते.व कोपरगाव हे ठिकाण निवड करण्यामागे सुद्धा त्याला भौगोलिक कारण असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळेच गुरु शुक्राचार्यांची या स्थानाची निवड केल्याचे आपल्याला दिसून येते.या ठिकाणी लग्न व तत्सम शुभ विधीसाठी कोणताही मुहूर्त लागत नाही त्याला या ठिकाणचे असलेले माहात्म्य हेच आजही कारणीभूत मानले जाते.या ठिकाणी गुप्त रुपात त्र्यंबकेश्वर असून त्यांच्या समोर नंदी नाही असे हे दुर्मिळ ठिकाण आहे.
वर्तमानात जगभरचे शास्रज्ञ मानवाला अमर करण्याच्या प्रयत्नात असताना ‘संजीवनी मंत्र’ नेमका काय होता.हा विषय आजही तितकाच महत्वाचा ठरत असून त्या काळी विशिष्ट अशांश आणि रेखांश यांच्यावर विशिष्ट काली व विशिष्ट अधिकारी पुरुषाने (ऋषी मुनींनी) शास्रोक्त पद्धतीने संजीवनी मंत्राचे उच्चारण केल्यास मृत सजीव अथवा मानव जिवंत होत असे.त्या सहाय्याने मुत दानव गुरु शुक्राचार्य यांनी जीवंत केल्याचे ग्रंथात उगीच नमूद केलेले नाही.बाराव्या शतकात पुणतांबा या ठिकाणी चांगदेव महाराज आपली समाधी उतरल्यावर मुत व्यक्तींना जिवंत करत असत.त्या ठिकाणी नंतर संत ज्ञानेश्वर,मुक्ताबाई आणि भावंडे आली त्यांनी चांगदेव महाराज समाधीत असताना त्यांचा गर्व हरण करण्यासाठी तेथील मृत व्यक्तींना जिवंत केल्याचा इतिहास फार जुना नाही.त्या ठिकाणाहून कोपरगाव शहर फार अंतरावर नाही त्यामुळे येथील कथेला आणि स्थानाला नक्की काही नक्कीच अर्थ आहे.मात्र परकीय आक्रमकांनी प्राचीन विद्या नष्ठ केली आहे.त्यामुळे आज हि विद्या भारतीयांना अशक्यप्राय वाटत असल्यास नवल नाही.
कोपरगाव बेट येथे दैत्य गुरु शुक्राचार्य महाराज यांचा प्राचीन आश्रम होता.व या ठिकाणी गोदावरी नदी पश्चिम वाहिनी होती.या ठिकाणी गुरु शुक्राचार्य यांची पत्नी जयंती,कन्या देवयानी यांच्यासह ते या आश्रमात वास्तव्यास होते.या ठिकाणी देवगुरु ब्रहस्पती यांचे पुत्र कचदेव हे विद्याभ्यासासाठी आल्याची नोंद मिळते.त्यांनी कपट करून समुद्र मंथन करताना झालेल्या देव-दानव युद्धात देवांना वाचविण्यासाठी,’संजीवनी विद्या’ मिळविण्यासाठी या आश्रमात प्रवेश मिळवला होता.या ठिकाणी गुरु शुक्राचार्य कन्या देवयानी हिस आपल्या जाळ्यात ओढून कचाने कपट करून ‘संजीवनी’ विद्या प्राप्त केली होती आजही हा संजीवनी पार अस्तित्वात असल्याची कथा सांगितली जाते.शुक्राचार्य आणि कच यांची आख्यायिका प्राचीन ग्रंथांत वर्णन केलेली आहे.हे भौगोलिक स्थान सकारात्मक उर्जात्मक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे व पवित्र मानले जाते.व कोपरगाव हे ठिकाण निवड करण्यामागे सुद्धा त्याला भौगोलिक कारण असल्याचे निष्पन्न झाले आहे.या स्थानामुळेच शुक्राचार्यांची या स्थानाची निवड केल्याचे आपल्याला दिसून येते.या ठिकाणी लग्न व तत्सम शुभ विधीसाठी कोणताही मुहूर्त लागत नाही त्याला या ठिकाणचे असलेले माहात्म्य हेच आजही कारणीभूत मानले जाते.या ठिकाणी गुप्त रुपात त्र्यंबकेश्वर असून त्यांच्या समोर नंदी नाही असे हे दुर्मिळ ठिकाण आहे.आजही या ठिकाणची महत्ती वादातीत मानली जाते.अलीकडील काळात या ठिकाणाकडे कालौघात भाविक भक्तांचे दुर्लक्ष झाले होते.मात्र येथील संस्थानने त्याचे महत्व अलीकडील काळात पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा प्रयत्न सुरु केला हि बाब नक्कीच कौतुकास्पद आहे.या स्थानाची माहिती जनतेला कळावी या साठी संस्थानचे विविध प्रयत्न सुरु असून त्यातूनच त्यांनी काही दिवसापूर्वी त्यावर गुरु शुक्राचार्यां यांच्या जीवनावर,’शुक्रतीर्थ’ नावाचे एक पुस्तक प्रसिद्ध केले होते.आता त्याची प्रगत अशी आवृत्ती त्यांनी प्रसिद्ध केली असून,’स्टोरीटेल'(storytel app) या अँपवर एक ऑडिओ प्रसिद्ध केला आहे.
त्यास प्रसिद्ध कलाकार सचिन सुरेश यांनी आपला भारदस्त आवाज दिला आहे.त्याचे प्रकाशन नुकतेच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
या प्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,संजय वडांगळें,दत्तात्रय सावंत,मधुकर साखरे,ॲड.नितीन भवर,दिलीप सांगळे,भागचंद रुईकर,मुन्ना आव्हाड,बाळासाहेब लकारे,बाळासाहेब जंगले,ओंकार आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी बाळासाहेब आव्हाड यांनी आवाहन केले असून त्यात त्यांनी,”सर्वांनी या ‘स्टोरी वेल'(Storytel) हे ॲप डाऊनलोड करून गुरू शुक्राचार्य महाराजांवर आधारित “शुक्र तीर्थ” या पुस्तकाचा ऑडियो बुक स्वरूपात अवलोकन करावे व या प्राचीन स्थानाची माहिती इच्छुक भाविक आणि चिकित्सक वाचकांना उपलब्ध करून द्यावी असे आवाहन शुक्राचार्य भक्त,भाविकांना करण्यात आले आहे.
या प्रसंगी प्रास्तविक भागचंद रुईकर यांनी केले.बाळासाहेब आव्हाड यांनी स्टोरीवेल या ऍप व पुस्तकाविषयी माहिती दिली आहे.यावेळी शेवटी राजेंद्र आव्हाड यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.
दरम्यान आज जगभरचे शास्रज्ञ मानवाला अमर करण्याच्या प्रयत्नात असताना संजीवनी मंत्र नेमका काय होता.हा विषय आजही महत्वाचा ठरत असून त्या काळी विशिष्ट अशांश आणि रेखांश यांच्यावर विशिष्ट काली व विशिष्ट अधिकारी पुरुषाने (ऋषी मुनींनी) शास्रोक्त पद्धतीने संजीवनी मंत्राचे उच्चारण केल्यास मृत सजीव अथवा मानव जिवंत होत असे.त्या सहाय्याने मुत दानव गुरु शुक्राचार्य यांनी जीवंत केल्याचे ग्रंथात उगीच नमूद केलेले नाही.बाराव्या शतकात पुणतांबा या ठिकाणी चांगदेव महाराज आपली समाधी उतरल्यावर मुत व्यक्तींना जिवंत करत असत.त्या ठिकाणी नंतर संत ज्ञानेश्वर,मुक्ताबाई आणि भावंडे आली त्यांनी चांगदेव महाराज समाधीत असताना त्यांचा गर्व हरण करण्यासाठी तेथील मृत व्यक्तींना जिवंत केल्याचा इतिहास फार जुना नाही.त्या ठिकाणाहून कोपरगाव शहर फार अंतरावर नाही त्यामुळे येथील कथेला आणि स्थानाला नक्की काही नक्कीच अर्थ आहे.मात्र परकीय आक्रमकांनी प्राचीन विद्या नष्ठ केली आहे.त्यामुळे आज हि विद्या भारतीयांना अशक्यप्राय वाटत असल्यास नवल नाही.