जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महिलेवर पुतण्याकडून विळ्याने हल्ला,महिला गंभीर जखमी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील रहिवासी असलेले शेतकरी रघुनाथ कारभारी घायतडकर (वय-७०) यांच्या पत्नी मुक्ताबाई रघुनाथ घायतडकर यांना त्यांचा पुतण्या अमोल नानासाहेब घायतडकर याने रात्रीच्या सुमारास नुकताच विळ्याने हल्ला चढवला असून त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.या प्रकरणी रघुनाथ घायतडकर यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने खलबल उडाली आहे.

दरम्यान या प्रकरणी माहिती घेतली असता सदर आरोपी तरुण हा व्यसनी असल्याची माहिती असून त्याचे दोन लग्न होऊनही दोन्ही बायका नांदत नसल्याने त्याबाबत त्याचा संशय आपल्या चुलतीवर असल्याने त्याने दारू पिऊन दारूच्या व्यसनात हे कृत्य केले आहे तर अन्य शेतबांधावरून त्यांच्यात वाद असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे रवंदे आणि परिसरात विविध तर्ककुतर्क होत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी शेतकरी हे रघुनाथ घायतडकर हे आपल्या पत्नीसमवेत आपल्या शेतात राहतात.त्यांच्या शेजारी त्यांचा भाऊ नानासाहेब घायतडकर हा आपल्या कुटुंबासोबत राहत आहे.त्यांचा किरकोळ कारणावरून वाद आहे.शनिवार दि.०३ जूनच्या मध्यरात्री ०१ च्या सुमारास फिर्यादी रघुनाथ घायतकडकर हे झोपलेले असताना त्यांची पत्नी मध्यरात्री त्यांना उठविण्यास आली असता ती रक्तबंबाळ झालेली आढळली होती.त्यांनी झोपेतून उठून त्या बाबत तिला विचारणा केली असता त्यांनीं आपल्यावर आपला पूतण्या अमोल घायतडकर याने रात्रीच्या सुमारास विळ्याने हल्ला करून आपल्याला तो पळून गेला आहे.त्यात आपल्याला तोंडावर,डोक्यात,डाव्या खांद्यावर,डाव्या हातावर जखमा झाल्या असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान आपल्याला कमी ऐकू येत असल्याने आपण उठण्याच्या आत त्याने धूम ठोकली आहे.तो पळून गेल्यावर आपल्या पत्नीने आपल्याला झोपेतून उठवले व घडलेली आपबिती घटना सांगितली आहे.

दरम्यान या प्रकरणी माहिती घेतली असता सदर आरोपी तरुण हा व्यसनी असल्याची माहिती असून त्याची आई दवाखान्यात असताना त्याने दारूच्या व्यसनात हे कृत्य केले असल्याची माहिती पोलिसी सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे रवंदे आणि परिसरात विविध तर्ककुतर्क होत आहे.

दरम्यान याबाबत आपल्या दूरध्वनीवरून आपण आपले सोमठाणा ता.येवला येथील जावई सोमनाथ रमण थोरात यांना कळवली त्यांनी आपल्या नाटेगाव येथील साडू भावाचा मुलगा उमेश नारायण मतसागर यास कळवून घटनास्थळी पाठवले होते.त्यांनी व मी आपल्या पत्नीला गावातील दवाखान्यात उपचारार्थ नेले व तेथून संत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

त्यानंतर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल होऊन याबाबत आरोपी अमोल घायतडकर याचे विरुद्ध गुन्हा क्रं.२८३/२०२३ भा.द.वि.कलम.३२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.संदीप बोटे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close