गुन्हे विषयक
चोऱ्यांचे सत्र सुरूच,आजही दिवसाढवळ्या मोठी चोरी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या इंडियन ओव्हरसीज बँकेचे ए.टी.एम.काल रात्री अज्ञात दोन चोरट्यांनी वायर रोप लावून तोडून व ओढून नेले असताना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास चांदगव्हाण येथील शेतकरी भाऊसाहेब आप्पासाहेब गुंडे (वय-५३)यांचे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यातील सोन्याचे दागिने व रोख रकमेसह ९९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे त्यामुळे सलग दोन दिवस चोरट्यांनी आपली लीला दाखविल्याने शहर पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
आज दुपारी दिवसा ढवळ्या चांदगव्हाण हद्दीत ११.३० -१२ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप बंद असताना व फिर्यादी आपले शेतात गेले असताना त्या संधीचा फायदा उचलत घराचे कुलूप तोडून घरातील ७५ हजार रुपये किमतीचे ३ तोळे वजनाची सोन्याची जुनी वापरती पोत,सोन्याची अंगठी व रोख रक्कम असा ९९ हजार ५०० रुपयांची मोठी चोरी गेली आहे.
सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव शहर आणि तालुक्यात चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र तयार झाले आहे.राजकीय नेते आणि पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. त्यामुळे चोरट्यांवर पोलिसांचा आणि पोलिसांवर नेत्यांचा धाक राहिलेला दिसत नाही असा आरोप नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर व वारंवार होऊ लागला आहे.गत काही महिन्यात रात्रीच्या सुमारास नागरीक सामसूम झाल्यावर चोरट्यांनी पोलिसांना हुलकावणी देऊन शहरातील निवारा-सुभद्रानगर परिसरातून एका रात्री तीन कार चोरी गेलेल्या असताना त्यांचा शोध लागलेला नाही.अन्य छोट्या मोठया चोऱ्यांचे गणतीच नाही.अशातच काल रात्री दि.२७ मे च्या पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी पोहेगाव येथील इंडियन ओव्हरसीज बँकेचे ए.टी.एम.महिंद्रा पिकअपच्या सहाय्याने चोरून नेऊन चोवीस तास उलटत नाही तोच आज दुपारी दिवसा ढवळ्या ११.३० -१२ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप बंद असताना व फिर्यादी आपले शेतात गेले असताना त्या संधीचा फायदा उचलत घराचे कुलूप तोडून घरातील ७५ हजार रुपये किमतीचे ३ तोळे वजनाची सोन्याची जुनी वापरती पोत,१२ हजार ५०० किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी याशिवाय रोख रुपये १२ हजार त्यात ५०० दराच्या नोटा आदी सुमारे असा एकूण ९९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.२५२/२०२३ भा.द.वि.कलम ४५४,३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करीत आहेत.