गुन्हे विषयक
एका विरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा,कोपरगावातील वाढत्या घटना चिंताजनक !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील रिद्धी-सिद्धी नगर येथील राष्ट्रवादीचा कार्यकर्ते व फिर्यादी शैलेश साबळे यांचे घराचा आरोपी सोबत सौदा करून तो व्यवहार पूर्ण न करता ते आपले घर नुकतेच साफ करण्यासाठी गेले असता आरोपी प्रकाश मनोहर खरे,त्यांची पत्नी व खरे यांची मुलगी आदींनी नुकताच फिर्यादी सॊबत वाद करून त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या विरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा मात्र साबळे यांचे विरुद्ध फिर्यादी महिला गायत्री प्रकाश खरे हिने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात साबळे विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गेल्या तीन दशकांपासून या कायद्याची अंमलबजावणी आपण पाहत असताना राजकीय प्रतिस्पर्ध्यांविरोधात निवडणुकांमध्ये,स्वत:च्या खासगी आणि मालमत्तेविषयक खटल्यांमध्ये,आर्थिक व्यवहारांमध्ये आणि नोकरीमधील संधी व सेवाज्येष्ठतेच्या वादांमध्ये या कायद्याचा झालेला गैरवापर अनेक न्यायालयीन निकालांमध्ये स्पष्ट झाला आहे.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत जर सकृद्दर्शनी खटला उभा राहू शकत नसेल किंवा न्यायिक पडताळणीत तक्रार दूषित हेतूने केलेली आढळली तर अशा परिस्थितीत अटकपूर्व जामीन देण्यावर सरसकट बंदी घातलेली नाही.अॅट्रॉसिटीज अॅक्टअंतर्गत एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सात दिवसात जबाबदार अधिकाऱ्यांमार्फत प्राथमिक चौकशीची प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी असे निर्देश दिले आहे.असे असताना कोपरगाव तालुक्यात असे गुन्हे वाढत असल्याबद्दल सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहरात घडली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरतील रहिवासी व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फिर्यादी शैलेश साबळे यांचा आरोपी प्रकाश मनोहर खरे यांच्यात सन-२०२० मध्ये घर खरेदीचा व्यवहार झाला होता.परंतु आरोपी हा व्यवहार पैसे देऊन पूर्ण करत नव्हते.त्यामुळे फिर्यादी शैलेश साबळे हे आपल्या घराची साफसफाई करण्यासाठी दि.११ मे रोजी दुपारी ४.३० वाजता आपल्या नातेवाईकांसोबत गेले असता आरोपी प्रकाश खरे व त्याची पत्नी गायत्री खरे व त्यांची मुलगी पूर्ण नाव माहिती नाही आदींनी त्यांना शिवीगाळ करून त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण करून त्यांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटास चावा घेतला होता.व त्यांना जखमी केले होते.व त्यांच्या खिशातून खाली पडलेला भ्रमणध्वनी हा लंपास केला असल्याचा आरोप करुन त्यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असताना काल रात्री उशिरा १०.२९ वाजता आरोपी गायत्री खरे (वय-५०) या महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शैलेश साबळे यांचे विरुद्ध गुन्हा क्रं.२३०/२०२४ भा.द.वि.कलम ४५२,३५४,३७९,३२३,५०४,५०६,४२७,१४३,१४९ सह अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंध अधिनियम) १९८९ व सुधारणा अधिनियम २०१५ चे कलम ३(१)(डब्ल्यू)(आय)३(२)(व्ही)(१)(२)(आर)(एस)अनव्ये आरोपी सह शैलेश साबळे व इतर ७-८ इसम याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यात फिर्यादी महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपण घरी असताना आरोपीने राहते घरी येवुन त्यांचे घराचे दरवाजाचे लॉक तोडुन त्यांच्या परवानगी शिवाय घरामध्ये प्रवेश करून घरातील सामानाचे नुकसान करून,घरामधील सामांनाची उचक पाचक करून फीर्यादीचा मोबाईल व घराच्या कागदपत्रांची फाईल असे चोरून घेवुन गेले आहे. तेव्हा फिर्यादी त्यांना विरोध करत असताना त्यांनी फिर्यादी यांना धक्का बुक्की करून त्यांचा हात धरून त्यांना बाजुला लोटुन फिर्यादीच्या हाताला दुखापत केली व त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून आपला विनयभंग केला आहे.तसेच आरोपी शैलेश साबळे फिर्यादी यांने जातीवाचक उल्लेख करुन,”तुम्हाला मी आज जिवंत सोडणार नाही तु आता मरशीलच पण तुझ्या नव-याला पण मी सोडणार नाही” अशी जीवे मारण्याची धमकी देवुन जातीवाचक शिवीगाळ केली असल्याचा गुन्हा शैलेश साबळे व त्याचे इतर साथीदारा विरूध्द दाखल केला आहे.
दरम्यान या घटनास्थळी शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आदींनी भेट दिली असून ते पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहे.