जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

विद्युत पंप चोरीचे सत्र सुरु,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पश्चिमेस साधारण १५ कि.मी.अंतरावर असलेल्या धोत्रे ग्रामपंचायत शिवारात गट क्रं.२६४/२ मधील विहिरीतून दि.१६ एप्रिल रोजी रात्री कधीतरी पाळत ठेवत अज्ञात चोरट्याने सुमारे ०९ हजार रुपये किमतीचे ०५ अश्वशक्तीचे दोन विद्युत पंप चोरून नेले आहे.या प्रकरणी फिर्यादी धनंजय आण्णासाहेब जामदार (वय-३३) यांनी गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने विद्युत पंप धारक शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव तालुक्यातील एक टोळी विद्युत पंपाची तांब्यांची तार काढून ती परस्पर विकत असल्याची घटना उघडकीस आणली होती.त्यानंतर बराच काळ या चोऱ्या थांबल्या होत्या.मात्र या वर्षी पुन्हा रब्बी हंगामात हा उपद्रव शेतकऱ्यांना सुरु झाला आहे.त्याबाबत धोत्रे येथील शेतकरी धनंजय जामदार यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कोपरगाव तालुक्यात भुरट्या चोरट्यांनी डोके वर काढले असून त्यांचा उपद्रव शेतकऱ्यांना ऐन उन्हाळी हंगामांत सोसावा लागतं आहे.या पूर्वी कोपरगाव शहरातील काही तरुणांनी असेच विद्युत पंप चोरी करण्याचा सपाटा सुरू केला होता.त्यांच्यावर पोलिसांनी पाळत ठेवून सदर टोळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या काळात पकडली होती.आता पुन्हा एकदा या चोरट्यांनी डोके वर काढले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत चिंता पसरली आहे.

सदर टोळी सदर विद्युत पंपाची तांब्यांची तार काढून ती परस्पर विकत असल्याची घटना उघडकीस आणली होती.त्यानंतर बराच काळ या चोऱ्या थांबल्या होत्या.मात्र या वर्षी पुन्हा रब्बी हंगामात हा उपद्रव शेतकऱ्यांना सुरु झाला आहे.त्याबाबत धोत्रे येथील शेतकरी धनंजय जामदार यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यात त्यांनी म्हटले आहे की,”आपली धोत्रे शिवारात शेती आपण सदर गावात आपले वडील,आई,पत्नी,व मुलाबाळासह राहत आहे.सदर ठिकाणी गट क्रं.२६४/२ मध्ये अडीच एकर क्षेत्र असून त्या मध्ये एक विहीर आहे.त्यात एक शेततळे आहे.त्या शेतीला सिंचनाचे पाणी देण्यासाठी आपण एक पाच अश्वशक्ती असलेला (पाणबुडी) विद्युत पंप टाकला होता.या शिवाय आपला आणखी एक गट क्रमांक २६१ असून त्यात आणखी एक शेत तळे आहे.त्या ठिकाणी शेती सिंचनासाठी आणखी एक ०५ अश्वशक्तीचा विद्युत पंप टाकला होता.

दरम्यान दि.१६ एप्रिल रोजी दुपारी ०१ वाजेच्या सुमारास शेतात चक्कर मारण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी सदर विद्युत पंप व्यवस्थित होते.त्या वेळी आपण आपल्या शेतीस पाणी दिले होते.त्या नंतर आपण दुसऱ्या दिवशी पुन्हा दि.१७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता गेलो असता त्या ठिकाणी स्टार्टरच्या वायर्स काढलेल्या होत्या.म्हणून संशय आला म्हणून आपण विहीरीत डोकावून पाहिले असता त्या ठिकाणी वरील वर्णनाचे दोन विद्युत पंप अर्थात दोन पाणबुड्या आढळून आल्या नाहीत.विहिरीतील पाईप कापलेला आढळून आला आहे.त्यानंतर आपण शेततळ्यार चक्कर मारून पहिला असता त्या ठिकाणीही तीच स्थिती आढळून आली आहे.त्यानंतर आपण आजूबाजूस शोध घेऊन पाहिला असता त्या पाणबुड्या विद्युत पंप अर्थात मोटारी आढळून आल्या नाहीत.त्यामुळे आपण कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हे.कॉ.राजेंद्र म्हस्के यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.क्रं.२११/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.राजेंद्र म्हस्के हे करत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close