जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अवैध दारूवर शहर पोलिसांची वक्रदृष्टी,दोन ठिकाणी कारवाई

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलिसांची अवैध व्यवसायावर वक्रदृष्टी झाली असून त्यांनी आज सकाळी मनाई वस्ती संवत्सर येथील दोन ठिकाणी कारवाई कारवाई करून जवळपास ४५ हजारांचा अवैज जप्त केला असून आरोपी मंदाबाई बळीराम आहेर व नांनासाहेब कारभारी गायकवाड याचे वर गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शहर परिसरात खळबळ उडाली आहे.

दोन्ही अवैध दारू निर्मितीचे गुन्हे हे वांरवार पोलिसांच्या रडारवर असलेल्या संवत्सर ग्रामपंचायत शिवारातील मनाई वस्ती असलेल्या ठिकाणी उघड झाले आहे.विशेष म्हणजे सहकारी कारखान्यासोबतच यातील आंबट रसायन हे पवित्र गोदावरी नदीत वाहून जात असून पवित्र गोदावरी नदी अशुद्ध होत असल्याचे दिसून आले आहे.खाली संवत्सर व अनेक पवित्र ठिकाणे असून त्यात भाविकांना आपले पवित्र स्नान करावे लागत आहे.त्यामुळे शहर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नवीन पोलीस अधिकारी म्हणून रामराव ढिकले यांनी आपला कार्यभार हाती घेतल्यापासून सुरुवातीचा काही काळ वगळता आपले अस्तित्व दाखविण्यास प्रारंभ केला असल्याचे आता दिसू लागले आहे.त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात गुरुवार दि.१३ एप्रिल रोजी सकाळी ८.३० ते १० वाजेच्या सुमारास दोन गुन्हे दाखल केले आहे.दोन्ही गुन्हे हे वांरवार पोलिसांच्या रडारवर असलेल्या मनाई वस्ती असलेल्या ठिकाणी उघड झाले आहे.विशेष म्हणजे सहकारी कारखान्यासोबतच यातील आंबट रसायन हे पवित्र गोदावरी नदीत वाहून जात असून पवित्र गोदावरी नदी अशुद्ध होत असल्याचे दिसून आले आहे.खाली संवत्सर व अनेक पवित्र ठिकाणे असून त्यात भाविकांना आपले पवित्र स्नान करावे लागत आहे.

यातील पहिला गुन्हा हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या पूर्वेस साधारण ०४ कि.मी.अंतरावर असललेल्या संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत घडला असून त्याच ठिकाणी सुमारे २० हजार रुपये किमतीची वैध गावठी दारू बनवताना आरोपी मंदाबाई आहेर हि आढळून आली आहे.या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली त्या ठिकाणी त्यांना नारंदी नदीचे पात्रालगत काटवनात सुमारे २० हजार किमतीचा अवैध गावठी दारु बनवताना सदर महिला आढळून आली आहे.त्या ठिकाणी १०० लिटर कच्चे रसायन आंबट उग्र वास असलेले फायबरचे टिपाडात आढळून आले आहे.

दरम्यान यातील दुसरा गुन्हा त्याच मनाई वस्ती भागात नारंदी नदीच्या काठी घडला असून त्यात फिर्यादी जालिंदर पुंजाजी तमनर हे असून त्यांनी त्याच भागातील आरोपी नानासाहेब कारभारी गायकवाड यांचेवर गुन्हा दाखल केला आहे.त्यात शहर पोलिसांना २५ हजार रुपये किमतीचे १०० लिटर उग्र आंबट वास येत असलेलं रसायन आढळून आले आहे.त्या ठिकाणचा आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.दोन्ही घटनास्थळी घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी फिर्यादी पुंजाजी तमनर यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या दप्तरी गुन्हा क्रं.१८२ व १८३ /२०२३ महाराष्ट्र पोव्हिंन्शन ऍक्ट ६५(फ)अन्वये नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी.एस.कोरेकर,व पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close