जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

चोरटा पकडला,कोपरगावातील अनेक गुन्हे उघड होणार !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर आणि तालुक्यातील दुचाकी आणि चार चाकी चोरांचा सुळसुळाट झाला असताना आज एक सकारात्मक बाब समोर आली असून त्यात शहर पोलिसांना नागरिकांनी सुधाकर कडूबा जाधव (वय-३१) या दुचाकी चोरट्यास धारणगाव रस्त्यावर दुचाकींसह रंगेहात पकडून दिले असून त्याच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोपरगाव शहरातील दुचाकी चोरी प्रकरणी दुचाकीचे मूळ मालक आपली गाडी शोधात असताना ‘तो’ धारणगाव रस्त्याच्या कडेला संशयित रित्या सापडला आहे.त्यास पाठलाग करून पकडले असता त्यास चांगलाच चोप दिला आहे.त्यास पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याची विचारपूस केली असता त्याचे नाव सुधाकर कडूबा जाधव (वय-३१) असे असून तो सांजुळ ता.फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे.

सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव शहर आणि तालुक्यात चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र तयार झाले होते.राजकीय नेत्यांचा पोलिसांवर आणि पोलिसांचा चोरट्यांवर धाक राहिलेला दिसत नाही असा आरोप नागरिकांमधून होऊ लागला होता.काही दिवसापूर्वी रात्रीच्या सुमारास नागरीक सामसूम झाल्यावर चोरट्यांनी पोलिसांना हुलकावणी देऊन शहरातील निवारा-सुभद्रानगर परिसरातून डॉ.जगदीश झंवर,सह्याद्री कॉलनी येथील लेखापरीक्षक दत्तात्रय खेमनर,आणि साईनगर या परिसरातून अड्.मनोज कडू यांची असे तब्बल एक-दोन नव्हे तर एक स्विफ्ट डिझायरसह दोन एर्टीगा अशा तीन कार चोरून आपला महा प्रताप दाखवला होता व पोलिसांना खुले आव्हान दिले होते.तर त्यानंतर सुभद्रानगर येथील पी.विल्यम एस.पी.चंदन या इसमाच्या घरातून सोन्याची साखळी व दोन अंगठ्या असा ०१ लाख २५ हजारांचा ऐवज लंपास केला होता.तर आणखी दोन घटनेत कोपरगाव बस स्थानक येथून मुर्शतपुर येथील विशाल प्रकाश शिंदे यांची दुचाकी तर संजीवनी कारखाना पार्किंग मधून चांदेकासारे येथील कर्मचारी मच्छीन्द्र भाऊराव होन आदी दोन ठिकाणच्या अनुक्रमे २५ व १५ हजार असे ४० हजारांच्या दोन दुचाक्यांची चोरी केली होती.या अलीकडील काही काळातील घटना आहे.अन्य नोंदणी न झालेले अनेक गुन्हे आहेत.त्यामुळे शहरात नागरिकांत वाहन चोरट्यांची मोठी भीती निर्माण झाली होती.त्यामुळे शहर आणि तालुक्यातील या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान तालुका आणि शहरातील पोलिसांपुढे उभे राहिले होते.

दरम्यान बुधवार दि.२२ मार्च रोजी रात्री ०८ वाजेच्या सुमारास फिर्यादी विकास गोरक्षनाथ शिंदे (वय-४२) रा.अंचलगाव यांची साईबाबा कॉर्नर वरून काळ्या रंगाची ‘होंडा शाईन’ हि दुचाकी (क्रं.एच.एच.१७ सी.जे.१३५६)हि चोरिस गेली होती.त्यांनी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.१३५/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये दाखल केला होता.व ते आपल्या गाडीचा शोध घेत असता त्यांना सदर चोरटा धारणगाव रस्त्याच्या कडेला सापडला आहे.

या प्रकरणी पोलीस दुचाकीचे मूळ मालक आपली गाडी शोधात असताना तो धारणगाव रस्त्याच्या कडेला संशयित रित्या सापडला आहे.त्यास पाठलाग करून पकडले असता त्यास चांगलाच चोप दिला आहे.त्यास पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याची विचारपूस केली असता तो सांजुळ ता.फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असल्याचे समजले आहे.त्याचे नाव सुधाकर कडूबा जाधव (वय-३१) असल्याचे समजत आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचेसह पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी भेट दिली आहे.

दरम्यान त्याच्याकडून वरील वर्णनाची सुमारे ७० हजार रुपये किमतीची ‘होंडा शाईन’ हि गाडी जप्त केली आहे.त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.त्यामुळे आणखी दुचाकी किंवा चारचाकी वाहने सापडण्याची शक्यता आहे.त्यामुळे वहाने चोरी गेलेल्या नागरिकांचे या घटनाक्रमाकडे लक्ष लागून आहे.याबाबत नागरिक आणि कोपरगाव शहर पोलिसांचे कौतुक होत आहे.पुढील तपासपोलिस निरीक्षक ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close