गुन्हे विषयक
जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा,कोपरगावात चार जणांवर गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत सोरटचा पैशावरील खेळ सुरू असल्याची गुप्त खबर तालुका पोलिसांना मिळाल्याने त्यांनी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास केलेल्या कारवाईत कार्यालयाच्या मागील बाजूस असललेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी मनोज दिलीप मथुरे,रा.येवला,सोमनाथ रेवजी कोळपे रा.कोळपेवाडी,अशोक गोकुळ ढोलपुरे रा.येवला,आनंद गणेश साळवे रा.सुरेगाव आदी आढळून आल्याने त्यांचे विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने सुरेगाव,कोळपेवाडीसह तालुक्यात अवैध सोरट खेळणाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
सुरेगाव ग्रामपंचायत नजीक पाठीमागील शेडमध्ये पैशावर जुगार सुरु असल्याची माहिती गुप्त माहितगार इसमाकडून तालुका पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार त्यांनी आपले पथक तयार ठेऊन त्या ठिकाणी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास त्या ठिकाणी तयारीनिशी धाड टाकली असता त्यांना त्या बातमीत तथ्य आढळले होते.त्यानुसार चार जणांवर कारवाई केली आहे.
कोपरगाव तालुक्यात नव्याने पोलीस निरीक्षक म्हणून वासुदेव देसले हे रुजू झाले आहे.त्यांनी तालुक्यातील अवैध व्यावसायिकांवर करडी नजर रोखली असून त्यांच्यावर कारवाई सुरु केली आहे.त्यामुळे अवैध व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.दरम्यान कोळपेवाडी नजीक असलेल्या सुरेगाव ग्रामपंचायत नजीक पाठीमागील शेडमध्ये पैशावर जुगार सुरु असल्याची माहिती गुप्त माहितगार इसमाकडून तालुका पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार त्यांनी आपले पथक तयार ठेऊन त्या ठिकाणी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास त्या ठिकाणी तयारीनिशी धाड टाकली असता त्यांना त्या बातमीत तथ्य आढळले होते.त्यानुसार त्यांनी केल्ल्या कारवाईत त्यांना लाल निळ्या रंगाच्या बारीक चिठ्ठ्या आढळून आल्या आहेत.त्याशिवाय ११ हजार ०६० रुपये किमतीच्या ५००,२००,१००,५०,२०,१० रुपये किमतीच्या रोख नोटा त्या ठिकाणी आढळून आल्या आहेत.
याशिवाय त्यांना त्या ठिकाणी त्यांना आरोपी मनोज दिलीप मथुरे,(वय-३२)रा.येवला,सोमनाथ रेवजी कोळपे (वय-३२) रा.कोळपेवाडी,अशोक गोकुळ ढोलपुरे (वय-३०)रा.बुंदेलपुरा,येवला,आनंद गणेश साळवे (वय-३६) रा.सुरेगाव आदी जुगारी तरुण आढळून आल्याने त्यांचे विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने सुरेगाव,कोळपेवाडीसह तालुक्यात अवैध सोरट खेळणाऱ्यांत खळबळ उडाली आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेसह तुषार धाकराव यांनी भेट दिली आहे.
या प्रकरणी फिर्यादी पो.कॉ.अविनाश अशोक तमनर यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या दप्तरी नोंद केली क्रं.१४४/२०२३ महाराष्ट्र जुगार कायदा कलम-१२ (अ) अन्वये नुकताच नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धाकराव हे करीत आहेत.