गुन्हे विषयक
अल्पवयीन मूलीचे अपहरण,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीचे गांधीनगर कोपरगाव येथील आरोपी किरण लहरे याने अपहरण केले असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने नुकताच दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अपहरीत अल्पवयीन मुलीचा पालकांनी शोध घेतला असता ती महाविद्यालयात दिसली नाही.तेंव्हा फिर्यादींना समजलेल्या माहितीनुसार ती तिच्या किरण लहरे या मित्रांसोबत असेल असे समजून त्याचा शोध घेतला असता तोही आम्हाला मिळून आला नाही.त्यानंतर फिर्यादीने किरण लहरे याचा भ्रमणध्वनी लावला असता तोही लागला नाही त्यानंतर हा गुन्हा दाखल केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी महिला हि कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असून एकत्रित कुटुंबात रहाते.ती एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असून दि.१५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास आई घरी आली असता तिला आपली मुलगी घरी आलेली दिसली नाही.तिने तिचा भ्रमणध्वनी लावून पहिला असता तो बंद स्थितीत आढळून आला होता.त्यामुळे त्यांनी तिची मैत्रीण असलेल्या दुसऱ्या मुलीस भ्रमणध्वनी लावला व तिला विचारले असता तिने तुमची मुलगी दुपारी ०१ वाजेच्या सुमारास मेडिकल मध्ये औषधं आणायला गेली होती.ती परत आली नाही.तेंव्हा मी तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही.
दरम्यान अपहरीत मुलीचा पालकांनी शोध घेतला असता ती महाविद्यालयात दिसली नाही.तेंव्हा फिर्यादींना समजलेल्या माहितीनुसार ती तिच्या किरण लहरे या मित्रांसोबत असेल असे समजून त्याचा शोध घेतला असता तोही आम्हाला मिळून आला नाही.त्यानंतर फिर्यादीने किरण लहरे याचा भ्रमणध्वनी लावला असता तोही लागला नाही.त्याच्यावर आमच्या मुलीचे प्रेम होते अशी माहिती आम्हाला चौकशी करताना समजली होती.त्यामुळे त्याचा फोन लावला असता तो हि लागला नाही त्यामुळे आमची खात्री झाली की आमच्या अल्पवयीन मुलीचे आरोपी किरण लहरे याने अपहरण केले आहे.दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी महिला हिने सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.नोंद क्रं.६८/२०२३ भा.द.वि. कलम ३६३ अन्वये नुकताच गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजू पुंड हे अधिकारी हे करीत आहेत.