जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

शहरात दारू पिऊन गोंधळ,कोपरगावात दोघांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलीस हद्दीत पोलीस रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना टाकळी नाका साईदेवा प्रतिष्ठान जुना टाकळी नाका या ठिकाणी येथे दोन इसम दारूच्या नशेत राहून मोठयाने आरडाओरडा करत असताना आढळल्याने शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली असून त्यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यांची नावे शुभम राजेंद्र पेकळे (वय-२७) व आकाश बबन वाजे (वय-३०) असे असल्याचे समजते त्यामुळे शहरातील मद्यपीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोपरगाव शहरात मद्यपी आणि चोरटे यांच्यावर पोलिसांचा धाक राहिलेला नाही त्यामुळे शहरात कोण कुठे काय करेल याचा भरवसा राहिलेला नाही.त्यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे.त्यामुळे अशा असामाजिक तत्वांवर कारवाई करणे गरजेचे बनले आहे.काही महिन्यांपूर्वी कोपरगाव राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव बस आगारात अशीच कारवाई कोपरगाव शहर पोलिसांनी केली होती.त्या नंतर पुन्हा एकदा असा गोंधळ पाहायला मिळाला असून त्यावर पोलिसांनी शुभम पेकळे व आकाश वाजे आदी दोन तरुणावर कारवाई केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरात मद्यपी आणि चोरटे यांच्यावर पोलिसांचा धाक राहिलेला नाही त्यामुळे शहरात कोण कुठे काय करेल याचा भरवसा राहिलेला नाही.त्यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे.त्यामुळे अशा असामाजिक तत्वांवर कारवाई करणे गरजेचे बनले आहे.काही महिन्यांपूर्वी कोपरगाव राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव बस आगारात अशीच कारवाई कोपरगाव शहर पोलिसांनी केली होती.त्या नंतर पुन्हा एकदा असा गोंधळ पाहायला मिळाला असून त्याची बातमी हाती आली आहे.

त्याचे झाले असे की,”कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संभाजी शिंदे व ज्ञानेश्वर भांगरे आदी पोलीस कर्मचारी हे दि.१७ फेब्रुवारी रात्री कर्तव्यावर असताना मध्यरात्री १२.१० वाजता पोलीस गाडी हि डायल-११२ च्या कर्तव्यावर होती.दरम्यान त्यांना जुना टाकळी नाका या ठिकाणी देवा प्रतिष्ठान जुना टाकळी नाका येथे आल्यावर दोन तरुण हे दारूने झिंगलेल्या अवस्थेत आढळून आले होते.पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे शुभम राजेंद्र पेकळे (वय-२७) रा.वंडांगळे वस्ती व आकाश बबन वाजे (वय-३०) रा.निवारा असे असल्याचे सांगितले आहे.त्यांच्या तोडांचा वास घेतला असता उग्र वास येत होता.त्यांना पोलिसांनी समजावून सांगितले असता ते पोलिसांचे ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते.व तेथून त्याना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती करून त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता ते दारूच्या अंमलाखाली असल्याचे आढळले होते.दरम्यान या प्रकरणी पोलीस कॉ.ज्ञानेश्वर मधुकर भांगरे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.नोंद क्रं.७१/२०२३ महाराष्ट्र दारूबंदी कलम ८५(१) अन्वये काल गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अर्जुन दारकुंडे हे अधिकारी हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close