जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

साखर कारखान्याच्या संचालकास मारहाण,कोपरगावात तिघांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सहकारी साखर कारखानदारीत अग्रणी असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक व कुंभारी येथील रहिवासी शिवाजी माधवराव घुले (वय-६३) यांना त्याच गावातील ईशान्य गडाचे (भाजप) कार्यकर्ते व आरोपी किशोर विजय कदम,दत्तू गजानन कदम,निलेश सुधीर कदम आदींनी लोखंडी गज,व हॉकीची काठी आदींनी मारहाण केली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात.प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते.मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे.त्यासाठी गावोगाव सदर महोत्सव साजरा करण्यास भाविकांच्या उत्सवपूर्व बैठकी आयोजित केल्या जात असून त्यातून काही ठिकाणी मारहाण करण्यापर्यंत मजल गेली असल्याचे निदर्शनास आले आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील मंदिरानजिक घडली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी शिवाजी घुले व आरोपी किशोर कदम अन्य सहकारी हे एकाच गावाचे रहिवासी असून तालुक्यातील ईशान्य व पश्चिम गडाचे प्रस्थापित नेत्यांचे दोन गटाचे कार्यकर्ते आहेत.त्या गावात आगामी शनिवार दि.१८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सव जवळ आला असताना त्यासाठी येथील महंतांनी त्यासाठी ग्रामस्थ आणि भाविकांची नियोजन बैठक काल सायंकाळी ०७.३० च्या सुमारास मंदिर परिसरात असलेल्या जागेवर आयोजित केली होती.त्या बैठकीसाठी कुंभारी येथील कार्यकर्ते,भाविक भक्त आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

सदर बैठकीस कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक झालेले जेष्ठ कार्यकर्ते व फिर्यादी शिवाजी घुले हे सदर ठिकाणी जात असताना व तेथील माकड मंदिराच्या पायऱ्या चढत असताना आरोपी किशोर कदम,दत्तु कदम व निलेश कदम आदींनी त्यांना अडवून,”तुझे मंदिरात काय काम आहे ? असे म्हणून त्यांचा हातावर गजाने,हॉकी स्टिकने नाकावर व हाताच्या कांबीवर मारहाण करून दुखापत करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.याशिवाय जातीचा उल्लेख करून तुम्ही काय करणार आहे ? “तुमचे तीन घरे आहेत आम्ही गावाचे मालक आहे” असे म्हणाले असल्याचा आरोप फिर्यादीत शेवटी केला आहे.

दरम्यान याबाबत फिर्यादी घुले यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.न.७६/२०२३ भा.द.वि.कलम ३२४,३२३ ३४१,५०४,५०६ ४२७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक व्ही.एन.कोकाटे हे करित आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close