जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पढेगावात महिलेची आत्महत्या,अकस्मात मृत्यूची नोंद

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)कोपरगाव तालुक्यातील पढेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेली महिला लताबाई रघुनाथ कर्पे (वय-५५) यांनी अज्ञात कारणाने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे.त्यांच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.त्या बऱ्याच दिवसापासून आजारी असल्याची माहिती मिळते.

शनिवार दि.११ जुलै रोजी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास लताबाई कर्पे यांनी अज्ञात कारणाने विषारी औषध घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.हि बाब घरातील सदस्यांच्या लक्षात आली तेंव्हा त्यांनी तातडीने त्यांना शिर्डी येथील साई संस्थानच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते तथापि उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.या घटनेबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ.शामकुमार सुभाष यांनी या घटनेची खबर पोलीस ठाण्यात दिली आहे.कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंदणी पुस्तकात याची नोंद क्रमांक ३७/२०२० सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी पवार हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close