जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

जुगार अड्ड्यावर नाशिक पोलिसांचा छापा,कोपरगावात आठ आरोपींवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसत असून तो काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाही वरून हे गुन्हे बाहेरील वरिष्ठ कार्यालयाकडून धाडी टाकून उघड होत असल्याने शहर पोलिसांची नाचक्की होताना दिसत असून नुकतीच नाशिक परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाड टाकून आठ जण जुगार खेळताना अटक केल्याने शहर पोलिस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

कोपरगाव शहरात अलीकडील काळात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी कोपरगाव शहर पोलिसांची कारवाई थिटी पडत असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे.काही महिन्यात नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गुन्हे उघड करून धमाल उडून दिली होती.त्या नंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याकडे नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाची वक्र दृष्टी झाली आहे त्यांनी जुगार अड्यावर कारवाई करून आठ जणांवर कारवाई केली असल्याने खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरात अलीकडील काळात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी कोपरगाव शहर पोलिसांची कारवाई थिटी पडत असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे.काही महिन्यात नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ०६ लाखांच्या गुटख्यासह अनेक गुन्हे उघड करून धमाल उडून दिली होती.त्या नंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याकडे नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाची वक्र दृष्टी झाली आहे.त्यांनी कोपरगाव तालुक्यात अवैधरित्या गॅसचे रॅकेट दि.२ जानेवारी २०२३ रोजी रंगेहात पकडले होते.त्यात कॅप्सूल अशोक लेलंड कंपनीच्या टँकरसह (क्रं.एम.एच.४३ बी.जी.७१५०) दुसरा त्याच कंपनीचा दोस्त कंपनीचे लहान वहान (क्रं.एम.एच.११ सी.एच.४४८०) ३० गॅस टाक्या असा सुमारे २७ लाख ९७ हजार ७१८ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे व आरोपी बुधाराम आनंदाराम विष्णोई वय-४० यासह राजस्थान ह.मु.जेऊर कुंभारी मधील पाच आरोपी विरुद्ध विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी पो.ह.शेख शकील अहमद (वय-५३) नाशिक यांनी गुन्हा दाखल केला होता.त्यामळे नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.त्या बातम्यांची शाई वाळते न वाळते तोच पुन्हा नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षक पथकाने पुन्हा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वदिनी म्हणजेच दि.२५ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता धारणगाव रस्त्याच्या कडेला अपना अंड्याचे बाजूला गाळ्याचे शेजारी पडदे लावून जुगार अड्ड्यावर एक धाडसी कारवाई केली आहे.त्यात १२ हजार १४० रुपये जप्त करत आरोपी राहुल जगन बहादुरे (वय-२८) वर्षे रा.दत्तनगर कोपरगाव,वसंत अनिल सिनगर (वय-३२) वर्षे रा.म्हसोबा चौक,धारणगाव रोड,कोपरगाव,तालीब अकबर कुरेशी (वय -३२)वर्षे रा.संजयनगर कोपरगाव,शेख अय्युब बशीर (वय-४२) रा.दत्तनगर कोपरगाव,अश्रफ मोहमद शेख (वय-२५वर्षे) रा.दत्तनगर कोपरगाव,राहुल कार्तिक जाधव (वय-१९ वर्षे) रा.संजयनगर कोपरगाव,कैलास मंजुळ रा.कोपरगाव,अक्षय शिंदे रा.कोपरगाव आदी आठ जणांविरुद्ध विरुद्ध फिर्यादी पोलीस हवालदार शेख शकील अहमद (वय-५३) विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांनी गुन्हा दाखल केला आहे.

त्यात त्यांनी म्हटलें आहे की,”वरील ठिकाणी आरोपीत मजकूर यांनी विनापरवाना बेकायदा एका टेबलवर १ ते १० अंकाचे पट खाली अंथरून त्यावर लोकांना पैसे लावून जुगार पत्यातील एक पत्ता काढून हार जीतीचा खेळ खेळताना मिळून आले आहे.दरम्यान घटनास्थळी नाशिक परिक्षेत्राचे पोलिस निरीक्षक श्री रोहोम,कोपरगाव येथील उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आदींनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.४६/२०२३ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) प्रमाणे दाखल केला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.या प्रकरणी नाशिक येथील फिर्यादी हवालदार शकील शेख यांनी दुजोरा दिला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.कोरेकर हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close