जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात पतंगबाजी नडली,दोन गटात तुफान हाणामारी,दोन जण जखमी

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव शहरात मोहिनीराज या उपनगरात रहिवासी असलेल्या व कोपरगाव नगरपरिषदेचे सत्ताधारी गटाचे आरोग्य माजी सभापती असलेला इसम व मनसेच्या एका शहर पदाधिकाऱ्याचा भाऊ यांच्या दोन गटात काल रात्री १० वाजेच्या सुमारास पतंगबाजी आवाजाच्या किरकोळ कारणावरून पाईप,काठ्या,दगड,विटा आदींचा मुक्तहस्ते वापर झाला असल्याची माहिती असून या तुंबळ हाणामारीत तीन जण जखमी झाले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत रात्री संबंधित आरोपीना ताब्यात घेतले असून यातील नगरपरिषद गटाच्या माजी पदाधिकऱ्यांचा गटातील दोन जण व फिर्यादी असे तिघे जण उपचारार्थ संत जनार्दन स्वामी रुग्णालयात भरती केले आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

हाणामारीच्या घटनेनंतर पोलिसांनी ठेवलेला बंदोबस्त छायाचित्रात दिसत आहे.

दरम्यान या घटनेबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेस दुजोरा दिला असून पोलीस आरोपींना अटक करण्याची कारवाई करत असल्याची माहिती दिली आहे.दरम्यान या घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून सदर ठिकाणी आज वरिष्ठ पोलीस अधिकारी आज भेट देणार असून त्या घटनेचा आढावा घेणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

शेजारच्या नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात अहमदाबाद,सुरत पाठोपाठ,पतंगोत्सवाची मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.येथे पतंग बनविण्याबरोबर पतंग उडवण्याची देखील एक वेगळीच कला साग्रसंगीत इथल्या नागरिकांनी आत्मसात केली आहे,त्यामुळे पाहुणे,मित्र मंडळी देखील स्पेशली संक्रातीला पतंग उडविण्यासाठी शहरात येतात.भोगी,संक्रात व कर हे तीन दिवस शहराच्या पतंगोत्सवात महत्त्वाचे मानले जातात.या शहरातील गल्ली बोळ रिकामे आणि घराच्या गच्ची,बाल्कनीत फुल्ल गर्दी असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.मकर संक्रांतीच्या दिवसात पाहायला मिळते त्यात यंदा रविवारच्या सुट्टीसह सोमवारचा दिवस देखील येथे पतंगोत्सव रंगला होता.कोपरगाव शहरही त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहर हे येवल्याच्या अत्यंत जवळ असल्याने या पतंगबाजीचा ताप कोपरगाव शहरात न आला तर नवल.नुकत्याच संपन्न झालेल्या या महोत्सवात अनेकांनी आपला आंनद लुटला होता.मात्र कोपरगाव शहराच्या दक्षिणेस असलेल्या मोहिनीराज नगर या ठिकाणी मात्र त्याला ऐन संक्रांतीच्या दि.१५ जानेवारी रोजी दिवशी गालबोट लागले असून पतंग महोत्सवास दिलेल्या आवाजाच्या कारणावरून वरील दोन गट एकमेकास भिडले होते.त्याबाबत दोन्ही गटांनी गुन्हे दाखल केले होते.पोलिसांनी दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली होती.व त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सोडून दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दोन्ही गटातील हल्ला-प्रतिहल्ल्यात वापरलेली दगड गोटे छायाचित्रात दिसत आहे.

दरम्यान दुसऱ्या दिवशी हा वाद मिटला असे समजून सर्व आपआपल्या कामास लागले असताना काल रात्री १० वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा या दोन्ही गटांची खुमखुमी समोर आलेली आहे.त्यामुळे त्यांनी एकमेकावर लोखंडी पाईप,लाकडी दांडके,विटा,दगड आदींच्या सहाय्याने मागची पुढची सर्व कसर काढल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.त्यात नगर परिषदेचे आरोग्याचे माजी सभापती व त्यांचा पुतण्या व फिर्यादी असे तिघे गंभीर जखमी झाल्याचे समजते.या ठिकाणी दोन्ही गटाचे जवळपास शंभरेक तरुण सहभागी झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान कोपरगाव तालुक्यात पतंगाच्या कारणावरून आणखी एक घटना वारी ग्रामपंचायत हद्दीत घडली असून यातील फिर्यादी रोहित संजय पठारे (वय-१९) हा जिमच्या बाहेर उभा असताना यातील आरोपी रोहित संजय पठारे,ऋषी जाधव,भास्कर आबू पवार आदींनी काल दि.१६ जानेवारी रोजी सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास बाजारतळावरील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील जिमच्या बाहेर उभा असताना संतोष गायकवाड यांचे जिन्यावरील पतंग परस्पर आणल्याचे कारणारून वाईट साईट शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी फिर्यादिस दिली असल्याचा गुन्हा क्रं.३४/२०२३ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध दाखल केला आहे.

दरम्यान जखमींना उपचारार्थ कोपरगाव नजीक असललेल्या संत जनार्दन स्वामी रुग्णालयात भरती केले आहे.त्यांच्यावर तेथे उपचार सुरु असून इकडे पोलिसांनी या हाणामारीचे वृत्त समजताच घटनास्थळी धाव घेतली असून दोन्ही गटांवर भाजीपाला व्यावसायीक (वय-३५) याने भा.द.वि.कलम ३२६,१४३,१४७,१४८,१४९,३२३,५०४,५०६ अन्वये दहा जणांवर कारवाई केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.दरम्यान अद्याप काही आरोपी फरार असून त्यांचा पोलीस अधिकारी शोध घेत आहे.या घटनेने कोपरगाव शहरातील कायदा सुव्यवस्था ऐरणीवर आली असून या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close