जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दुचाकी बेदरकार चालवली,कोपरगावात युवकांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील भरवस्तीत आपली दुचाकी बेदरकार चालवून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रामवाडी,संवत्सर येथील आरोपी तरुण गणेश परशराम जाधव (वय-२५) याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे शहरातील युवा पिढीतील तरुणावर भीतीचे सावट पसरले आहे.

दरम्यान कोपरगाव शहरातील काही तरुण आपल्या दुचाकीला असलेला सायलंसर बदलून मोठा फटाका आवाज देणारा बसवून शहरात मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण निर्माण करत आहे.त्यामुळे अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या बेशिस्त तरुणावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,तरुणाई वर्तमानात कोणाचीही पर्वा न करता पालकांनी विश्वासाने दिलेल्या दुचाकीच्या वेगावर आरुढ होऊन दुसऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करून वेगाने चालविण्याची प्रथा प्रचलित करू पाहत आहे.तिच्यावर प्रतिबंध करणे गरजेचे बनले होते.त्यादिशेने कोपरगाव शहरातील पोलिसांचे पाऊल पडत आहे हि समाधानाची बाब आहे.त्यांच्यावर वचक निर्माण होणे काळाची गरज आहे.मात्र त्या दिशेने कारवाई झाल्याची हि पहिलीच घटना मानली पाहिजे.याआधी अशी कारवाई झाली असेल तर ती माध्यमापासून दुर्लक्षित ठेवली असली पाहिजे किंवा केलीच नसली पाहिजे.त्यामुळे कोपरगाव शहरात मोठया संख्येने असलेले दवाखाने आणि त्यातील रुग्ण यांना त्याची किंमत चुकवावी लागत होती.त्यामुळे या कारवाईचे स्वागत केले पाहिजे मात्र या आणि या सारख्या बऱ्याच बातम्या पोलीस पत्रकार आणि माध्यमे यांच्या पासून का लपवून ठेवत आहे हे समजायला मार्ग नाही असो तरीही उशिराने मिळवलेल्या बातमीचे स्वागत आहे.त्याबाबत पोलीस कर्मचारी एकनाथ लिंबोरे आणि पो.हे.कॉ.गोपीनाथ कांदळकर,श्री कांबळे आदींचे स्वागत आहे.

याबाबत फिर्यादी लिंबोरे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपण दि.२४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर गस्त करत असतांना एक तरुण डॉ.आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दरम्यान आपल्या ताब्यातील बजाज सी.टी.दुचाकी (क्रं.एम.एच.१५ बी.के.२९६) हि बेदरकार चालवून सार्वजनिक ठिकाणी इतरांची सुरक्षा व्यवस्था धोक्यात येईल अशी चालवून धोका निर्माण केला आहे.त्यास थांबण्यास इशारा करून तो थांबवला असता त्याने आपले नाव गणेश परशराम जाधव (वय-२५) असे सांगितले आहे.

दरम्यान पोलिसांनी त्यास कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आणून त्यावर गुन्हा क्रं.४५९/२०२२ भा.द.वि.कलम २७९,३३६ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्ग दर्शनाखाली पोलिस हे.कॉ.राजेंद्र कांबळे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close