गुन्हे विषयक
जाण्यायेण्याचा रस्ता केला बंद,कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या आरोपी संदीप अशोक खारतोडे याने तहसीलदार व न्यायालय यांनीं दिलेला रस्ता बंद करून फिर्यादिस शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी फिर्यादी शिवाजी संतु दहे (वय-४०) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे सोनेवाडी आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी शिवाजी संतु दहे व आरोपी यांच्यात वाद निर्माण झाल्यावर कोपरगाव येथील न्यायालय व तहसीलदार आदींनी फिर्यादिस त्यातून रीतसर मार्ग काढून रस्ता काढून दिला होता.त्यानंतर काहि काळ शांतता निर्माण झाली होती.मात्र आरोपी संदीप खारतोडे याने वरील तारखेस आणि वेळेस अनाधिकाराने फिर्यादीचे शेतातील रस्त्यावर आपल्या महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर घालून अनाधिकाराने रस्ता नांगरून जाण्यायेण्याचा रस्ता बंद करून टाकला त्यावरून हा राडा झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”वर्तमानात रब्बी पिकांचा उभारणीचा हंगाम सुरु असून शेतकऱ्यांची आपल्या गहू,हरभरा,मका,आदी पिके उभारण्याची लगीन घाई सुरु आहे.इंग्रज राजवटीत केलेल्या जमीन मोजण्यानंतर अद्याप सरकारला आधुनिक व उपग्रहीय पद्धतीने मोजण्या करणे शक्य झालेले नाही त्यामुळे ग्रामीण भागात वारंवार रस्ते आणि शेताचे बांध यांच्यावरून वाद निर्माण होत आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीत दि.०४ डिसेंबर रोजी सायंकाळी ०६ वाजेच्या सुमारास घडली असून सदर ठिकाणी असलेल्या गट क्रमांक ६२(१) मध्ये फिर्यादी शिवाजी संतु दहे यांना कोपरगाव येथील न्यायालय व तहसीलदार आदींनी वाद निर्माण झाल्यावर फिर्यादिस त्यातून रीतसर मार्ग काढून रस्ता काढून दिला होता.त्यानंतर काहि काळ शांतता निर्माण झाली होती.मात्र आरोपी संदीप खारतोडे याने वरील तारखेस आणि वेळेस अनाधिकाराने फिर्यादीचे शेतातील रस्त्यावर आपल्या महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर घालून अनाधिकाराने रस्ता नांगरून जाण्यायेण्याचा रस्ता बंद करून टाकला आहे.याबाबत फिर्यादी यांनी त्यास जाबसाल केला असता आरोपीने,”तू,या रस्त्याने परत आला तर जीवे मारील” असा सज्जड दम दिला आहे.
दरम्यान फिर्यादीने घाबरून जाऊन कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व सहाय्यक फौजदार ए. व्ही.गवसने यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.४८८/२०२२ भा.द.वि.कलम ३४१,१८८,५०४,५०६ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.गवसने हे करीत आहेत.