जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

चोरट्यांची वक्रदृष्टी मोटारी नंतर आता विद्युत पंपावर,कोपरगावात गुन्हे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख शिवारात अज्ञातच चोरट्यांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी गट क्रं.३६४(१) मधील व गोदावरी नदी पात्रातील पाच अश्वशक्तीच्या सुमारे १६ हजार रुपये किमतीच्या दोन पाणबुड्या असलेले विद्युत पंप अज्ञात कारणासाठी चोरून नेल्या असल्याचा गुन्हा फिर्यादी अविनाश प्रभाकर पानगव्हाणे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दखल केला आहे.त्यामुळे आता चोरट्यांची वक्र दृष्टी आता मोटारी नंतर विद्युत पंपावर गेली असल्याने कोपरगाव शहर आणि तालुक्यातील शेतकऱ्यांत भितीचे वातावरण तयार झाले आहे.

दि.१ डिसेंबर रोजी फिर्यादी हे आपल्या विद्युत पंपाचा फ्यूज गेला होता दरम्यान वीज नसल्याने ते तो बसवून आपण घरीं गेले होते.दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास आपण आपला विद्युत पंप सुरु करण्यासाठी विहिरीवर गेले असता त्या ठिकाणी आपल्या पंपाचा पाईप बाहेर ओढलेला व तोडलेला स्थितीत आढळला होता.त्यांनी आजूबाजूस व अमृतेश्वर महादेव मंदिराचा बाजूस पाहिले असता त्या ठिकाणीही तीच स्थिती होती.सुमारे सोळा हजार रुपयांचे दोन विद्युत पंप चोरट्यानी लांबवलेले आढळले आहे.

कोपरगाव तालुक्यात आता रब्बी हंगाम सुरु झाला आहे.त्यासाठी विद्युत पंपाचे महत्व पिकांना पाणी देण्यासाठी अहंम आहे.त्यात संशय नाही मात्र वर्तमानात चोरट्यांची आता वक्रदृष्टी या विद्युत पंपावर गेली असल्याचे निष्पन्न झाले आहे.अशीच घटना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पश्चिमेस बारा कि.मी.अंतरावर असलेल्या माहेगाव देशमुख शिवारात गट क्रं.३६४ (१) मध्ये गोदावरी नदी काठी घडली आहे.

दरम्यान दुसऱ्या एका घटनेत कोपरगाव शहरातील ख्रिश्चन स्मशान भूमीनजीक रहिवासी असलेले इसम भाऊसाहेब त्रिंबक जगदाळे यांची महिंद्रा बोलेरो क्रं.एम.एच.१५ बी.जे.८६८९) हि अज्ञात चोरट्यानी चोरून नेली आहे.त्यांचा कॉंक्रिट मशीन भाड्याने देण्याचा व्यवसाय असल्याचे समजते.पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नुकतीच कोपरगावातील दोन्ही पोलीस ठाण्यांना भेट दिली असताना या तीन चोऱ्या घडल्या आहेत हे विशेष ! कोपरगाव शहरातील दिवसागणिक वाढत असलेल्या वाहन चोऱ्या या पोलिसांना आव्हान ठरल्या आहेत.

याबाबत फिर्यादी अविनाश प्रभाकर पाणगव्हाने (वय-५३) यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यात म्हटले आहे की,”माहेगाव देशमुख शिवारात आपण आपल्या कुटूंबात राहतो.आपली शेती व विद्युत पंप हे आपल्या वडीलांच्या नावावर आहे.आपल्या शेतात आपली व संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे अमृतेश्वर महादेव मंदिर विश्वस्त मंडळाचे विद्युत पंप आहेत.दि.१ डिसेंबर रोजी आपण आपल्या विद्युत पंपाचा फ्यूज गेला होता.वीज नसल्याने तो बसवून आपण घरीं गेलो होतो.दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास आपण आपला विद्युत पंप सुरु करण्यासाठी विहिरीवर गेलो असता त्या ठिकाणी आपल्या पंपाचा पाईप बाहेर ओढलेला व तोडलेला स्थितीत आढळला होता.आपण आजूबाजूस पाहिले असता अमृतेश्वर महादेव मंदिराचा बाजूस पाहिले असता त्या ठिकाणीही तीच स्थिती होती.त्यावरून लक्षात आले की आपले विद्युत पंप कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.याची खात्री झाल्यावर आपण सदर ट्रस्टचे विश्वस्त भाऊसाहेब भास्करराव पानगव्हाणे यांना सदर भ्रमणध्वनी वरून घटनेची वर्णी दिली होती.आपण व त्यांनी आजूबाजूस शोध घेतला असता सदर विद्युत पंप आपल्याला आढळून आले नाही.यावरून आपली खात्री झाली की,कोणातरी अज्ञात ईसमाने आपले विद्युत पंप अज्ञात कारणासाठी चोरून नेले आहे.त्यांची प्रत्येकी किंमत ०८ हजार रुपये तर दोन्ही मिळून १६ हजार रुपये होती.

याबाबत फिर्यादी अविनाश पानगव्हाणे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठण्यात धाव अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गु.नोंद क्रं.४८०/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.कॉ.राजू चव्हाण हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close