जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

बहिणीची छेड काढली,जाब विचारल्याने फिर्यादिस मारहाण,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील रवंदे ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या फिर्यादीच्या बहिणीची छेड काढल्या प्रकरणी त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या भावाला व त्याच्या मित्रास आरोपी अविनाश विठ्ठल कंक्राळे व सुभाष सोपान कदम या दोघांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा फिर्यादीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान यात आरोपीनी फिर्यादीच्या विरुद्ध दुसरा गुन्हा दखल केला असून त्यात फिर्यादी हे त्यांचे दुकानासमोर बसलेले असताना आरोपीने त्या ठिकाणी येऊन,’तू’,’दुपारी आपल्या बहिणीची छेड का काढली ? म्हणून शिवीगाळ केली बांबूंच्या काठीने मारहाण केली आहे.फिर्यादीचे आई वडील त्या ठिकाणी आले असता त्यांनी त्या ठिकाणाहून जाताना,”आमचे नादी लागायचे नाही,तुझ्याकडे बघतोच” असे म्हणून दम देऊन धूम ठोकली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी तरुण व आरोपी हे एकाच गावातील रहिवासी आहेत.फिर्यादीची बहीण हि गुरुवार दि.०४ मे रोजी रात्री ०९ वाजेच्या सुमारास दुकानात काही चीजवस्तू आणण्यासाठी गेली असता त्या ठिकाणी असलेले आरोपी अविनाश कंक्राळे व त्याचा सहकारी सुभाष सोपान कदम हे सदर दुकानासमोर बसलेले होते.त्यावेळी आरोपीनी फिर्यादीच्या बहिणीची छेड काढली असल्याचा आरोप केला आहे.

या प्रकरणी फिर्यादीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपण व आपल्या भावकितील इसम असे दोघे जण दुपारी १.३० वाजेच्या सुमारास फिर्यादीची बहीण दुकानात काही साहित्य घेण्यासाठी आली असता तिची छेड का काढली असा जाब विचारला असता आरोपी अविनाश कंक्राळे याने फिर्यादिस वाईट साईट शिवीगाळ करून दुसरा आरोपी ऋषिकेश कदम याने गळ्यावर काहीतरी धारदार वस्तू मारून गंभीर दुखापत केली व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.तर सुभाष कदम याने फिर्यादिस कशाने तरी मारून डावे हाताचे बोटास दुखापत करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी फिर्यादीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.जखमी कोपरगाव नजीक असलेल्या संत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

दरम्यान घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे आदींनी भेट दिली आहे.

दरम्यान यात आरोपीनी फिर्यादीच्या विरुद्ध दुसरा गुन्हा दखल केला असून त्यात फिर्यादी हे त्यांचे दुकानासमोर बसलेले असताना आरोपीने त्या ठिकाणी येऊन,’तू’,’दुपारी आपल्या बहिणीची छेड का काढली ? म्हणून शिवीगाळ केली बांबूंच्या काठीने मारहाण केली आहे.फिर्यादीचे आई वडील त्या ठिकाणी आले असता त्यांनी त्या ठिकाणाहून जाताना,”आमचे नादी लागायचे नाही,तुझ्याकडे बघतोच” असे म्हणून दम देऊन धूम ठोकली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी फिर्यादी तक्रारीवरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या दप्तरी अनुक्रमे गुन्हा क्रं.२३५,२३६ /२०२३ भा.द.वि कलम ३०७,३२३,५०९,५०६,३४ अन्वये नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close