जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

एकास काठीने मारहाण,कोपरगावात तिघांविरुद्ध गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील रहिवासी असलेला फिर्यादीचा मुलगा जैनुद्दीन मोहम्मद तांबोळी (वय-३५वर्ष) व सून असे मंजूर ते हंडेवाडी रस्त्याने काल रात्री ९ वाजेच्या सुमारास पायी फिरत असताना अचानक तीन इसम त्यांच्या जवळ आले व त्यानीं आश्रमाचे कारणावरून फिर्यादीचा मुलगा यास काठीने डोक्यावर हाता-पायावर मारहाण करून जखमी केले आहे.

मंजूर येथील घटनेत तीन आरोपी आपल्या दुचाकीवर येऊन त्यांनी फिर्यादीचा मुलगा जैनुद्दीन यास म्हणाला की,”तुम्ही आश्रमाच्या नादी लागू नका तुमच्याकडे बघून घेऊ असे म्हणून वरील तिघांनी फिर्यादीचे मुलास काठीने डोक्यात,हाता-पायावर मारहाण करून जखमी करून फरार झाले आहे.या घटननेने मंजूर परिसरात खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी महमंद तांबोळी आणि नजीक असलेल्या एका आश्रमाचा जाण्यायेण्याच्या रस्त्याचा वाद असल्याचे समजते.त्याबाबत महसूल विभागात दावा सुरु आहे.त्याबाबत संबंधित तहसीलदार यांनी काही दिवसापूर्वी घटनास्थळी भेट दिली असल्याचे वृत्त आहे.त्याबाबत निवडा होणे अभिप्रेत असताना काल काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास फिर्यादीचा मुलगा जैनुद्दीन तांबोळी आणि त्याची पत्नी हे जेवण झाल्यावर मंजूर-हंडेवाडी या रस्त्याने शत पावली करत असताना सोमवार दि.२८ नोव्हेंबर रोजी रात्री ०९ वाजेच्या सुमारास तीन अनोळखी इसम आपल्या दुचाकीवरून तोंडे बांधून घटनास्थळी आले व त्यांनी फिर्यादीचा मुलगा जैनुद्दीन यास काठीने डोक्यात,हातपायावर मारहाण करून जखमी केले आहे.या प्रकरणी त्यांनी अनेकांकडून मदतीची अपेक्षा केली होती मात्र त्यांना मदत मिळाली नाही दरम्यान सदरची बातमी येथील पोलीस पाटील श्रीराम रामराजे यांना समजली त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कर्मवीर काळे सहकारी कारखान्याची रुग्णवाहिका पाचारण केली व त्यास कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे.तेथे उपचार केल्यानंतर त्यांनीं रात्री १२.३० वाजता कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.४७६/२०२२ भा.द.वि.कलम-३२४,५०६,३४ प्रमाणे अज्ञात तीघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड याचे मार्गदर्शनाखाली पो.ना.चव्हाण हे करीत आहेत.दरम्यान याघटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close