जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव शहरात चोरट्यांचा धिंगाणा,तीन ठिकाणी चोरी,एक ठिकाणी चोरीचा प्रयत्न,नागरिकांत घबराहट

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात चोरीचे प्रमाण वाढत चालले असून आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास निवारा व ओमनगर परिसरात त्यांनी आपली ‘हात की सफाई’ दाखवत
द्वारकानाथ पन्नालाल मुंदडा यांच्या घराचा कोयंडा तोडून घराच्या आत कपाटातील चांदीचा गणपती व अन्य चीजवस्तू असा ५०-६० हजारांचा ऐवज लंपास केला आहे.त्यात रोख ७-८ हजार रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे.तर प्रथम रोहित पटेल यांची होंडा कंपनीची ८० हजार रुपये किमतीची युनिकॉर्न दुचाकी लंपास केली आहे या शिवाय ओमनगर येथे मधुकर कांबळे यांचे ६६ हजार रुपये किमतीचे साधारण २ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले गेले असल्याची माहिती माहितगार सूत्रांनी दिली आहे.

कपाटातील चोरी दाखवत असताना द्वारकादास मुंदडा दिसत आहे.

दरम्यान आज सकाळी नगर येथील गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त खबरीनुसार त्यांनी केलेल्या कारवाईत गुटख्याच्या दोन गाड्या जप्त केल्या असून यातील २.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर एक मारुती ओमनी गाडी व मारुती वॅग्नोर अशा दोन गाड्या पोलिसांनी जप्त केल्याची कारवाई झाली आहे त्याची किंमत ३.१० लाख असल्याची विश्वसनीय माहिती हाती अली असून गुन्हा दाखल करण्याचे काम अंतिम टप्यात आले असल्याचे समजते.यामुळे अवैध व्यावसायीकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरात अधूनमधूनच भुरटे चोरटे आपले डोके वर काढत असून त्यांचा उपद्रव शहर पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या निवारा हद्दीत घडली असून त्या ठिकाणी
द्वारकानाथ पन्नालाल मुंदडा यांच्या घराचा कोयंडा तोडून घराच्या आत कपाटाचे कुलुप तोडून त्यातील चांदीचा गणपती व अन्य चीजवस्तू असा ५०-६० हजारांचा ऐवज लंपास केला आहे.त्यात रोख ७-८ हजार रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे.मात्र त्यांनी आपल्या काही आरोग्य विषयक कारणामुळे गुन्हा दाखल करण्याचे टाळले असल्याची विश्वसनीय बातमी आहे.
दंरम्यान पहिल्या घटनेत प्रथम रोहित पटेल यांची होंडा कंपनीची ८० हजार रुपये किमतीची ‘युनिकॉर्न’ दुचाकी लंपास केली आहे.
या शिवाय ओमनगर येथे मधुकर लक्ष्मण कांबळे साधारण ६६ हजार रुपये किमतीचे २ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले गेले असल्याची माहिती माहितगार सूत्रांनी दिली आहे.तथापि ते बाहेरगावी असल्याने
याप्रकरणी त्यांचे जावई ज्ञानेश्वर अंबादास शिंदे (वय-३८) रा.पश्चिम कल्याण जि. ठाणे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा क्रं.३७३/२०२२,भा.द.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे दाखल केला आहे.
त्यात ५० हजार किमतीचे सोन्याचे २० ग्रॅम वजनाचे गंठण,१५ हजार किमतीचे ८ ग्रॅम वजनाचे मिनी गंठन,१ हजार रुपये किमतीची १ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ असा ६६ हजार रुपयांचा अवैज लंपास केला आहे.

या शिवाय निवारा परिसरात असलेले शिक्षक श्री आंबेडकर यांच्या घराचे कुलूप तोडले मात्र त्या कुटुंबातील सदस्य जागे असल्याने पुढील अनर्थ टळला आहे.ही घटना निवारा परिसरात पिण्याचे पाणी नळाला आल्यावर व सर्व नागरिक व महिला जाग्या झाल्यावर सकाळी.६.१५ वाजेच्या सुमारास घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान मुंदडा यांच्या घराच्या समोर आर.आर.पाटील सर यांच्या घरासमोर असलेल्या चलचित्रणात चोरटे उघड झाले आहे.त्यांनी आपल्या तोंडाला काळे धुडके बांधले असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान या चोरीच्या घटनेने कोपरगाव शहरात नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनास्थळी नगर येथील पोलीस पथक आले असल्याची माहिती आहे.त्यांनी चोरट्यांचा मागमूस शोधण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र अद्याप तरी चोरटे निष्पन्न झाले नाही.कोपरगाव शहर पोलिसांच्या नाकाखाली सलग तीन-चार चोऱ्या करून चोरट्यानी पोलिसांना आव्हान दिले आहे.त्यामुळे पोलीस आता काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close