जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

‘त्या’ घोटाळ्यातील आरोपीवर अखेर कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद आरोग्य विभागातील ठेकेदारीवर काम करणारा संगणक कर्मचारी अमित राजेंद्र संगवी गत महिन्यापासून नगरपरिषदेतील रक्कम गायब करून फरार झाला होता.त्याबाबत आरोग्य प्रभारी आरोग्य निरीक्षक सुनील सोपान आरण यांनी १.९८ लाखांची रक्कम अपहार केल्याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल केल्याने या गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब झाले आहे.त्यामुळे ‘जनशक्ती न्यूजसेवा’ या संकेतस्थळाचे वृत्त खरे निघाले असून नागरिकांनी या वृत्ताचे स्वागत केले आहे.

सदर आर्थिक घोटाळा हा फेब्रुवारी २०२२ ते १९ सप्टेंबर २०२२ या कालखंडातील असून या अपहारीत रकमेत सेफ्टीक टॅंक उपसणे जमा रक्कम पावत्या,आग विझवणे जमा पावत्या रक्कम,दंड पावती रक्कम,सुरक्षा ठेव रक्कम जमा करून त्याच्या पावत्या देणे आदी विविध कामाच्या रकमेचा समावेश आहे.सदर पावत्या प्रभारी आरोग्य निरीक्षक यांच्या संगणकाचा आय.डी.वापरून ‘मायनेट’ प्रणालीतून परस्पर लेखा विभागात न भरता आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्या आहेत.व संगणक प्रणालीतून उडवून टाकल्या होत्या.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषदेत डिसेंबर २०२१ पासून ‘प्रशासक राज’ सुरु आले आहे.तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचा कालावधी डिसेंबर २०२१ मध्ये संपला आहे.त्यांच्या कालखंडात बऱ्यांपैकी प्रतिबंध झाला असल्याचे दिसून आले होते.त्यानंतर कोपरगाव नगरपरिषदेत पदाधिकारी व नगरसेवक यांना ‘न भूतो’ असा’ साग्रसंगीत’ निरोप देण्यात आला होते.त्यानंतर पालिकेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ‘प्रभारी राज’ आले होते.मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचेकडे नगराध्यक्ष यांचा अतिरिक्त कार्यभार सोपवला गेला होता.यामुळे शहरातील विविध विभागात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वचक राहिला नसल्याचे उघड होत आहे.विविध विभागात बेदिली माजली आहे.कोणाचे कोणावर नियंत्रण राहिले नाही.राजकीय नेते आणि नगरसेवक केवळ आगामी नगरपरिषद निवडणुक रणनीतीच्या धांदलीत दिसत आहे.त्यातून अनेक गैरप्रकार वाढीस लागले आहे.अशीच आरोग्य विभागातील घटना नुकतीच उघड झाली होती.त्यावर आमच्या प्रतिनिधीने प्रकाश झोत टाकला होता त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती.
कोपरगाव आरोग्यासह सर्वच विभागात मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कमतरता असून त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून काही कर्मचारी हे ठेकेदारीवर भरलेले आहे.त्यातील एक वादग्रस्त कर्मचारी हा कर्मवीरनगर या उपनगरातील रहिवासी आहे.तो कर्मचारी गत महिन्यापासून कामावर आलेला नव्हता.तो फरार झाला असल्याने आरोग्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेठीस धरले होते.त्यामुळे आरोग्य विभागातील बेताल कारभारामुळे वरिष्ठ अधिकारी हैराण झाले होते.तो का फरार झाला आहे.याचा शोध घेतला असता त्याने आपल्या कडे आलेली ‘सक्सेन पंपा’ची सुमारे (१ ते १.२५ नव्हे) तर १ लाख ९८ हजार रुपयांची रक्कम नगरपरिषदेच्या खात्यात भरलेली नाही असे निदर्शनास आले आहे.हि रक्कम ९८ पावत्यांची असल्याचे बोलले जात आहे.त्याच्या या बेताल वागण्याने वरिष्ठ अधिकारी संतापले असून दि.२५ सप्टेंबर रात्री ९.३० वाजेच्या सुमारास त्यांनी त्याचे घर गाठले होते.व त्या ठिकाणी त्यांच्यात गल्लीत उभे राहुन मोठा ‘अकाली शिमगा’ केला होता.त्यामुळे हा विषय वाऱ्यासारखा गल्लीत आणि गल्लीतून गावभर पसरला होता.
दरम्यान या कोलाहलात त्या कर्मचाऱ्याच्या घरचे लोक आणि वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांच्यात वादावादी झाली होती.त्यांनी आमच्या मुलावर विनाकारण आरोप लादून त्याला बदनाम करत असल्याचा आरोप केला होता.या संबंधी आमच्या प्रतिनिधीने संबंधित कर्मचाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नव्हता.मात्र प्रभारी आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या बाबतच्या घटनेला दुजोरा दिला होता.मात्र सदर रक्कम एकढी मोठी नाही.ती २४-२५ हजार असल्याची बतावणी केली होती.बातमी प्रसिद्ध झाल्यावर कोपरगाव शहरातील सत्ताधारी गटातील काही माजी पदाधिकारी यांनी तातडीने बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता.त्यामुळे सदर अधिकारी काहीतरी लपवत असल्याचे निष्पन्न झाले होते.

दरम्यान संबंधित आर्थिक गैरव्यवहार करणारा इसम शहरातील माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक यांच्या मार्फत मिटवामिटवी करण्यासाठी गेला होता.त्यामुळे या गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब झाले होते मात्र रक्कम नेमकी किती याचा घोळ बाकी होता.तो आता निष्पन्न झाला आहे.सदरची रक्कम १ लाख ९८ हजार इतकी आहे.हे दाखल गुन्ह्यावरून निष्पन्न झाले आहे.त्यात प्रमुख अधिकाऱ्यांनी यात कठोर भूमिका घेतली हि त्यातले त्यात समाधानाची बाब आहे.

सदर आर्थिक घोटाळा हा फेब्रुवारी २०२२ ते १९ सप्टेंबर २०२२ या कालखंडातील असून या अपहारीत रकमेत सेफ्टीक टॅंक उपसणे जमा रक्कम पावत्या,आग विझवणे जमा पावत्या रक्कम,दंड पावती रक्कम,सुरक्षा ठेव रक्कम जमा करून त्याच्या पावत्या देणे आदी विविध कामाच्या रकमेचा समावेश आहे.सदर पावत्या प्रभारी आरोग्य निरीक्षक यांच्या संगणकाचा आय.डी.वापरून ‘मायनेट’ प्रणालीतून परस्पर लेखा विभागात न भरता आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्या आहेत.व संगणक प्रणालीतून उडवून टाकल्या होत्या.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी प्रभारी आरोग्य निरीक्षक सुनील आरण यांनी गु.र.क्रं.३१७/२०२२ भा.द.वि.कलम ४२०,४०६ अन्वये गुन्हा दखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करत आहेत.
आता आगामी काळात प्रशासनाचे प्रमुख अधिकारी पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close