निवड
सिंधी समाज चैरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदाची निवड जाहीर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील सिंधी समाजाची बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून त्यात सर्वानुमते मनोहर कृष्णानी यांची “सिंधी समाज चैरिटेबल ट्रस्ट” या संस्थेच्या अध्यक्षपदी मनोहर कृष्णानी यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सदर बैठकीत ट्रस्टची कार्यकारणी पुढील प्रमाणे निवडण्यात आली असून उपाध्यक्ष पदी गोविंद (विकी)शर्मा यांची तर
सचिव पदी हरिष आर्य यांची तरखजिनदार पदी रिंकेश खुबानी यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान मुख्य विश्वस्तपदी चेतन खुबानी,विनोद शर्मा,अमित शर्मा व हरेश कराचीवाला यांची निवड करण्यात आली आहे.
सदर विश्वस्त मंडळाने लगेचच समजासाठी पुढील काळासाठी करण्यात येणाऱ्या कार्याची माहिती दिली आहे.
नवीन कार्यकारणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.