जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

चाकूचा वार करून दुचाकी लुटली,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पढेगाव शिवारात फिर्यादी व त्यांची भावजयी हे आपल्या दुचाकीवरून आधार कार्ड व अन्य कागद पत्र घेण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्यात अडवून त्यांच्या छातीवर चाकूचा व लोखंडी गजाचा डोक्यात वार करून त्यांच्या ताब्यातील हिरो-होंडा हि दुचाकी घेऊन पोबारा केल्या प्रकरणी आरोपी भागवत भारम भोसले,पदमा भागवत भोसले,अनिता भागवत भोसले,तुकाराम भारम भोसले आदींविरुद्ध फिर्यादी भगीरथ बडोद भोसले याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी व त्याची भावजयी संगीता भोसले हे दोघे आपल्या हिरो होंडा एच.एफ.डिलक्स वरुन (चेसी क्रं.एम.बी.एच.ए.डब्ल्यू.१४९ एन.एच.ओ.१८२८) (दुचाकींचा क्रमांक उपलब्ध नाही) आधारकार्ड व अन्य कागदपत्र घेण्यासाठी घरी पढेगाव येथे वरील तारखेस व वेळी जात असताना बोकटे रोडवरून पढेगाव वस्तीवर वळत असताना त्यांना वरील आरोपी भागवत भारम भोसलेसह चार आरोपीनीं त्यांना रस्त्यात अडवून विरुद्ध फिर्यादी भगीरथ बडोद भोसले सर्व रा.४५ चारी यांनी त्यांना चाकूने व लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी भगीरथ भोसले व आरोपी भागवत भोसले हे एकाच गावातील रहिवासी आहेत.मात्र फिर्यादी वर्तमानात बुरुडगाव येथे रहिवासी आहे.त्या यांच्यात कायम कुरबुरी व हाणामाऱ्या चालू असतात.अशीच घटना दि.३० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता बोकटेरोड वर घडली आहे.फिर्यादी व त्याची भावजयी संगीता भोसले हे दोघे आपल्या हिरो होंडा एच.एफ.डिलक्स वरुन (चेसी क्रं.एम.बी.एच.ए.डब्ल्यू.१४९ एन.एच.ओ.१८२८) (दुचाकींचा क्रमांक उपलब्ध नाही) आधारकार्ड व अन्य कागदपत्र घेण्यासाठी घरी पढेगाव येथे वरील तारखेस व वेळी जात असताना बोकटे रोडवरून पढेगाव वस्तीवर वळत असताना त्यांना वरील आरोपी भागवत भारम भोसले,पदमा भागवत भोसले,अनिता भागवत भोसले,तुकाराम भारम भोसले आदीं चार आरोपीनीं त्यांना रस्त्यात अडवून विरुद्ध फिर्यादी भगीरथ बडोद भोसले सर्व रा.४५ चारी यांनी त्यांना चाकूने व लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले आहे.व त्यांच्या ताब्यातील वरील क्रमांकाची दुचाकी बळजबरीने घेऊन पोबारा केला आहे.

दरम्यान घटनास्थळी शिर्डी उपविभागागीय पोलीस अधिकारी संजय सातव,पोलीस निरीक्षक जाधव,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुसारे यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.३७७/२०२२ भा.द.वि.कलम ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्ग दर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close