कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात बिबट्या,नागरिकांत भीती !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात अनेक दिवसांपासुन कुठल्या अन कुठल्या गावात बिबट्याने पाळीव जनावरे फस्त केल्याच्या घटना घडल्या दोन दिवसांपासुन तालुक्यातील पुर्व भागात असलेल्या पढेगावला बिबट्या आढळून आल्यामुळे पशुपालक व नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी रात्री ज्ञानदेव शिंदे यांचे वस्तीवर बिबट्याने शेळी पकडली होती तथापि कुत्र्यांनी केलेल्या गदारोळात अर्धा तास तिथेच थांबुन नंतर बिबट्याने धूम ठोकली.तोच मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास जवळच असलेल्या भानुदास शिंदे यांचे वस्तीवर त्यांच्या सुनेस बिबट्यासह पिल्ले निदर्शनास आली होती.त्यामुळे गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
पढेगावात गावात नवरात्र उत्सव अगदी जल्लोषात सुरु असताना संतोषी माता मंदिर आणि रजपुतबाबा मंदिरात रात्री कथा आणि पंगतीचे नियोजन केलेले असल्यामुळे दोन्ही ठिकाणी रात्री भाविकांची मोठी गर्दी असते.सोमवारी रात्री ज्ञानदेव शिंदे यांचे वस्तीवर बिबट्याने शेळी पकडली मात्र कुत्र्यांनी केलेल्या गदारोळात अर्धा तास तिथेच थांबुन नंतर बिबट्याने धूम ठोकली.तोच मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास जवळच असलेल्या भानुदास शिंदे यांचे वस्तीवर त्यांच्या सुनेस बिबट्यासह पिल्ले निदर्शनास आली.त्यामुळे गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
बिबट्याच्या दहशतीत महावितरणची रात्री येणारी वीज शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर घालणार आहे.सध्या खरीपाची पिके काढणीला आली असुन धान्य तयार करण्याची लगबग असताना रात्री घरातुन बाहेर पडावे की नाही याची सर्वांना चिंता आहे.याबाबत वनविभागाच्या प्रतिभा सोनवणे यांनी सायंकाळी कर्मचारी पाहणी करण्यास पाठवणार असल्याचे सांगितले आहे.