गुन्हे विषयक
फरार मुलीचा प्रियकर व मुलगी कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात,मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या नगर-मनमाड महामार्गालगत भन्साळी ट्रॅक्टर जवळ रहिवासी असललेली अल्पवयीन मुलगी (वय-१७) हिने नुकतीच आपल्या राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली असताना त्याच दिवशी सदर मयत मुलीची मोठी बहीण फरार झाली असल्याचा प्रकरणात संशयित बहीण व तिचा प्रियकर पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यांची कसून चौकशी सुरु केली आहे.त्यामुळे यातील तथ्यांश बाहेर येईल असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान यात फरार मुलीचा प्रियकर हा तिच्या नात्यातील असून सदर मुलगा हा तिला पाहायला आला होता.मात्र वडिलांना सदर स्थळ पसंत नसल्याने त्यांनी त्या स्थळास नकार दिला होता.त्यातूनच एक वर्षापुवी त्यांचे सूत जमले होते.त्यातून तिने पुढचे पाऊल उचलले असल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान आज कोपरगाव शहर पोलिसानी आज दिवसभर या प्रकरणाची चौकशी केली आहे मात्र पोलीस अधिकारी त्यावर काही बोलण्यास तयार नाही.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत मुलगी हिचे वडील हे समृद्धी महामार्गावर वाहनावर चालक असून घरात आई,एक मोठी बहीण,एक लहान भाऊ असा परिवार असून आहे.ती नगर-मनमाड रस्त्यालगत कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असून मयत मुलगी हि सोमैय्या महाविद्यालयात अकरावी शास्त्र विषयात शिक्षण घेत होती.मात्र तिने अज्ञात कारणाने दि.३० सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० नंतर आपल्या राहत्या घरात पलंगाला दोरी अडकून गळफास (हास्यास्पद दावा) घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रं.६०/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली असून पुढील तपास पोलिस अधिकारी करत आहे.
दरम्यान या प्रकरणात मयत मुलीची बहीण या घटनेनंतर बेपत्ता झाली होती.त्यामुळे या घटनेने कोपरगाव शहर पोलीस चक्रावून गेले असून त्यांनी या प्रकरणी फरार मुलीचा शोध सुरु केला होता. या घटनेने कोपरगाव शहर पोलिसांपुढे या गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी सदर गायब मुलीचा शोध घेतला असून ती वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथून तिच्या प्रियकरासह ताब्यात घेतली असल्याचे समजते. त्यांची कसून चौकशी सुरु केली आहे.यात सदर मुलीच्या प्रियकराने आपले हात झटकले असल्याचे समजत आहे.तर मुलीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेऊन आपला हिसका दाखवला असल्याचे समजत आहे.मात्र फरार थोरली बहीण मात्र यावर पोलिसांची डाळ शिजू देत नसल्याचे समजत आहे.त्यामुळे मयत मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला यावर पडदा उठायला अद्याप तरी तयार नाही.
दरम्यान यात फरार मुलीचा प्रियकर हा तिच्या नात्यातील असून सदर मुलगा हा तिला पाहायला आला होता.मात्र वडिलांना सदर स्थळ पसंत नसल्याने त्यांनी त्या स्थळास नकार दिला होता.त्यातूनच एक वर्षापुवी त्यांचे सूत जमले होते.त्यातून तिने पुढचे पाऊल उचलले असल्याची माहिती मिळत आहे.त्याला पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.दरम्यान आज कोपरगाव शहर पोलिसानी आज दिवसभर या प्रकरणाची चौकशी केली आहे मात्र पोलीस अधिकारी त्यावर काही बोलण्यास तयार नाही असे दिसत आहे.आमच्या प्रतिनिधीने पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना दुरध्वनी करून पाहिला मात्र त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही.दरम्यान आज पर्यंत सदर अल्पवयीन मुलीचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालेला नाही त्यानंतरच सदर घटनेचा उलगडा होण्यास मदत होणार आहे.