गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात ५.६५ लाखांची मोठी चोरी,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेस साधारण ३० कि.मी.अंतरावर असलेल्या चासनळी शिवारात काल मध्यरात्री १२.२६ च्या सुमारास अज्ञातच चोरट्यानी फिर्यादीचा घरासमोर उभा करून ठेवलेला ३.५० लाखांचा ट्रॅक्टर व एक २.१५ लाख रुपयांचे थ्रेशर मशीन असा एकूण ५.६५ लाखांचा ऐवज लंपास केला आहे.या प्रकरणी फिर्यादी बापू नाना तनपुरे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे वाहन चालकांत खळबळ उडाली आहे.
चासनळी येथे तनपुरे हार्डवेअर व ईलेक्टरीक नावाचे दुकान आहे.ते आपले दि.२० सप्टेबर रोजी रात्री ८ वाजता दुकान बंद करून घरी गेले होते.व सकाळी त्यांना एक व्यक्तीचा फोन आला की,त्यांच्या दुकानंतच चोरी झाली आहे.त्यात स्वराज कंपनीचा ७४४ या मॉडेलचा ट्रॅक्टर (क्रं.एम.एच.१७ बी.एक्स.६२०२) व पुंनी कंपनीचे थ्रेशर मशीनचा अज्ञातच चोरट्यानी पोबारा केला आहे.ती बातमी त्यांना संजल्यावर त्यांनी घट्नास्थळी धाव घेतली असता त्यांना त्या बातमीत तथ्य आढळले आहे.
कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस साधारण सहा कि.मी.अंतरावर असलेल्या संवत्सर शिवारात नऊ चारी नजीक रहिवासी असलेले शेतकरी अनिल हरिभाऊ सोनवणे यांच्या वस्तीवर दि.१५ सप्टेंबर च्या पहाटे १.३० च्या सुमारास ६-७ जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने चाकुसारख्या हत्याराचा धाक दाखवून सोने-नाणे अशा चिज वस्तू मिळून अंदाजे १२ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणाच्या बातम्यांची शाई वाळलेली नसताना काल मध्यरात्री पुन्हा एकदा चोरट्यानी आपली ‘चौर्यलीला’ तालुका पोलिसांना दाखवून दिली आहे.त्यामुळे वहानचालकांत खळबळ उडाली आहे.संवत्सर शिवरतीलक चोरीतील तीन आरोपी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात जेरबंद केले आहे.मात्र अद्याप चार आरोपी फरार आहे.अशातच काल रात्री हि गंभीर घटना उघड झाली आहे.
त्याचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी बापू नाना तनपुरे हे चासनळी येथील रहिवासी असून त्यांचा व्यवसाय शेती व दुकानदारी आहे.त्यांचे चासनळी येथे तनपुरे हार्डवेअर व ईलेक्टरीक नावाचे दुकान आहे.ते आपले दि.२० सप्टेबर रोजी रात्री ८ वाजता दुकान बंद करून घरी गेले होते.व सकाळी त्यांना एक व्यक्तीचा फोन आला की,त्यांच्या दुकानंतच चोरी झाली आहे.त्यात स्वराज कंपनीचा ७४४ या मॉडेलचा ट्रॅक्टर (क्रं.एम.एच.१७ बी.एक्स.६२०२) व पुंनी कंपनीचे थ्रेशर मशीनचा अज्ञातच चोरट्यानी पोबारा केला आहे.ती बातमी त्यांना संजल्यावर त्यांनी घट्नास्थळी धाव घेतली असता त्यांना त्या बातमीत तथ्य आढळले आहे.त्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सदर घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व पो.हे.कॉ.सुरेश बोटे यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी फिर्यादी यांच्या खबरी वरून अज्ञातच चोरट्या विरुद्ध गुन्हा क्रं.३६५/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे नोंद दप्तरी दाखल केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.डी.बोटे हे करित आहेत.