गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात मोठा गोवंश साठा जप्त

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर हद्दीतील रेल्वे गेट जवळ मोठा गोवंश साठा वाहतूक करताना एक अशोक लेलंड जातीचा ट्रक कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी जप्त केला आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांचे कौतुक होत आहे.अलीकडील काळात गोवंश जातीची कत्तल होत आहे हि बाब भाजपच्या राज्यात निंदनीय ठरत आहे.
हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे,संपन्नतेचे,मांगल्याचे प्रतीक आहे.हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे.गोमूत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे. गोमय (गाईचे शेण),गोमूत्र(गाईचे मूत्र),गाईचे दूध,दही,तूप यांच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात.जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ ‘ऋग्वेद’ आहे.त्यात गाईचे स्थान उच्च आहे असे सांगणारा एक मंत्र आहे.मात्र आधुनिक युगात गाय दुर्लक्षित झाली असून तिची मोठ्या प्रमाणावर कत्तल सुरु आहे.अशीच घटना कोपरगाव शहरानाजीक उघड झाली आहे.
हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे,संपन्नतेचे,मांगल्याचे प्रतीक आहे.हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे.देशी गाय आज जर्शी गायींमुळे दुर्लक्षित झाली असली तरी तिचे धार्मिक महत्व कमी झालेले नाही भाजप सरकारने गोवंश हत्या बंदी कायदा केला आहे.त्यामुळे उपयोगी असलेला गोवंश हत्या करणे कायद्याने बंदी आहे.तरीही काही सामाजिक तत्व हा कायदा मानायला तयार नाही अशीच घटना नुकतीच शिंगणापूर हद्दीत उघड झाली आहे.असून कोपरगाव शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त खबरी नुसार दि.५ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास एक अशोक लेनलँड जातीचा तर्क मोठ्या प्रमाणात गोवंश घेऊन जाणार असल्याची खबर पोलिसांना लागली होती.
दरम्यान त्या गुप्त खबरी नुसार पोलिसांनी सापळा लावला असता त्या ठिकाणी व त्या निर्धारित वेळी एक पांढऱ्या रंगाचा चार चाकी ट्रक (क्रं.एम.एच.१५ ए.वाय.८१४५) त्या ठिकाणी जाताना आढळून आला आहे.त्या ठिकाणी पोलिसानी हल्लाबोल केला असता त्यास पळून जाण्याची संधी मिळाली नाही.परिणामस्वरूप सदर ट्रक पोलिसानी जप्त केला आहे.त्यात त्यांना २० हजार रुपये किमतीची काळ्या तांबड्या रंगाची व उभ्या शिंगाची एक जर्शी गाय,२० हजार किमतीची काळा- पांढरा रंग असलेली आखूड शिंगाची गाय,१५ हजार रुपये किमतीची काळा पांढरा रंग असलेली दोन शिंगाची जर्शी गाय, तितक्याच किमतीची काळ्या पांढऱ्या रंगाची दोन शिंगाची तिसरी गाय व २.५० लाख रुपये किमतीचा अशोक लेलंड जातीचा पांढऱ्या रंगाचा चार चाकी ट्रक असा एकूण ३ लाख २० हजार किंमतीचा अवैज आढळून आला आहे.त्यात वरील गोवंश जनावरे दाटीवाटीने घेऊन जाताना आढळून आले आहे.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,भरत दाते,पो.हे.कॉ.आर.पी.पुंड आदींनी भेट दिली आहे.
या प्रकरणी फिर्यादी जालिंदर पुंजाजी तमनर (वय-३८) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगावसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२७९/२०२२ महाराष्ट्र पशु क्रूरता अधिनियम क ११(अ)(ड)(ई)(फ)महा.पशुवाहतुक अधिनियम कलम ४७,मोटार वाहन कायदा कलम १८३/१७७ प्रमाणे वरील ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शना खाली पो.हे.कॉ.पी.बी.ढाकणे हे करीत आहेत.