जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महिलेला शारीरिक अत्याचाराची धमकी,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव हद्दीतील हनुमानवाडी येथील रहिवासी असलेली फिर्यादी महिलेस त्याच गावातील पांडव नावाच्या आरोपीने फिर्यादी महिला घरात झोपलेली असताना घराचा पत्र्याचा दरवाजा बाजूला सारून अश्लील शिवीगाळ करून शारीरिक अत्याचाराची धमकी देऊन विनयभंग केला आहे.या प्रकरणी फिर्यादी महिला कमल एकनाथ ढमाले (वय-७४) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कान्हेगावसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आरोपी पांडव हा दि.१ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या घरी हनुमानवाडी येथे जाऊन सदर महिला झोपलेली असताना घराचा पत्र्याचा दरवाजा बाजूस करून अनाधिकाराने घरात घुसून महिलेला शिवीगाळ करून सदर महिलेला शारीरिक अत्याचार करण्याची धमकी दिली आहे.त्यामुळे सदर फिर्यादी महिला धास्तावून गेली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी जेष्ठ महिला हि कान्हेगाव येथील रहिवासी असून त्यांचा त्याच गावातील आरोपी यांच्यात किरकोळ कारणावरून वादविवाद आहेत.

आरोपी पांडव हा दि.१ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या घरी हनुमानवाडी येथे जाऊन सदर महिला झोपलेली असताना घराचा पत्र्याचा दरवाजा बाजूस करून अनाधिकाराने घरात घुसून महिलेला शिवीगाळ करून सदर महिलेला शारीरिक अत्याचार करण्याची धमकी दिली आहे.त्यामुळे सदर फिर्यादी महिला धास्तावून गेली आहे.त्यामुळे फिर्यादी महिलेने त्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरुद्ध दि.३ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३४१/२०२२ भा.द.वि.कलम ४५२,२९४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शना खाली पो.हे.कॉ.म्हस्के हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close