गुन्हे विषयक
कोपरगावातील ‘त्या’गुन्ह्यांचे रूपांतरण खुनात,चार अटक,दोन फरार

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील मंजूर ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेला नामदेव सोनवणे हा आपल्या मुलांना शाळेत सोडून घरी येत असताना आरोपी शंकर नरहरी गावंड,गणेश शंकर गावंड आदींसह सहा जणांनी शिर्डी-लासलगाव रस्त्यालगत असलेल्या टिळेकर यांच्या किराणा दुकानासमोर केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी मयत झाल्याने यात खुनाचे कलम वाढविण्यात आले असून यात कोपरगाव तालुका पोलीसांनी चार जणांना गजाआड केले आहे.तर दोन जण अद्याप फरार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मयत मंजूर येथील दोन एकर जमीन खंडाने करत होता.तिचा व्यवहार आपल्या मालेगाव येथील जवळच्या नातेवाईकांशी करून त्याचे २७ लाखांचे साठेखत केले होते.व पुन्हा ती जमीन तो स्वतः खंडाने करणार होता.मात्र पैशाअभावी तो व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही.मात्र व्यवहार पूर्ण न झाल्याने ती जमीन गावातील स्थानिक शंकर गावंड व त्यांचे सहकारी पश्चिम गडाचे माजी संचालक साहेबराव सोनवणे या दोघांनी हा ३२ लाखांचा व्यवहार केला होता.त्याचा मयताचे मनात राग होता.व त्याचा ताबा घेण्यासाठी पोलीस व महसुली अधिकारी गेले असताना तेथे मयताने त्यास जमिनीची मोजणी करण्याचा बहाणा केला असल्याचे उघड झाले आहे.त्यातून पुढील महाभारत घडले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी महिला शोभा नामदेव सोनवणे यांचे पती नामदेव सुधाकर सोनवणे व आरोपी शंकर गावंड व गणेश शंकर गावंड यांची जमीन शेजारी-शेजारी आहे.त्यांच्यात शेतीतील जमिनीतील रस्त्याच्या कारणावरून अनेक दिवसापासून वाद होते.दि.१९ ऑगष्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेचा पती नामदेव सोनवणे हा आपल्या मुलांना चासनळी येथील शाळेत सोडून घरी येत असताना त्यास शिर्डी-लासलगाव या रस्त्यावरील टिळेकर यांच्या दुकानासमोर आरोपी शंकर गावंड,त्यांचा मुलगा गणेश गावंड,राकेश शंकर गावंड,साहेबराव पुंजाजी सोनवणे,रविन्द्र साहेबराव सोनवणे,समाधान साहेबराव सोनवणे आदीं सहा जणांनी गैर कायद्याची मंडळी जमवून हातातील गजाने,काठीने,दांड्याने,कुऱ्हाड,कोयत्याच्या सहाय्याने फिर्यादीच्या पतीस मारहाण करून गंभीर जखमी केले होते.त्यांचे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी महिला,तिंचा भाया सुनील सोनवणे,फिर्यादीची जाव उषा सोनवणे आदी साक्षिदार गेले असता त्यांनाही जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप केला होता.
दरम्यान या घटनेतील फिर्यादीचे पती नामदेव सोनवणे यांचे धक्कादायक निधन झाले आहे.यापूर्वी फिर्यादी महिलेच्या फिर्यादीवरून कोपरगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्रं.३२२/२०२२ भा.द.वि.कलम ३२६,३२४,३२३,५०४,५०६,५०९,१४३,१४४,१४७,१४८,१४९,अ.जा.जमाती (अत्याचार सुधारणा कायदा-२०१५ चे ३(आय),(आर)३(आय) (एस) प्रमाणे गुन्हा दखल केला होता.
दरम्यान यातील जखमी व फिर्यादी महिलेचा पती नामदेव सोनवणे याचे निधन झाल्याने यात आता यात हत्येचे कलम ३०२ वाढविण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधिकारी यांनी दिली आहे.
दरम्यान यातील आरोपी शंकर गावंड,साहेबराव सोनवणे,रवींद्र सोनवणे,समाधान सोनवणे आदी चार जणांना अटक केली आहे.तर गणेश गावंड व राकेश गावंड हे अद्याप फरार आहे.त्यांचा तालुका पोलीस कसून शोध घेत आहे.दरम्यान पुढील तपास शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव हे करीत आहेत.
मयत हा मूळ सटाणा तालुक्यातील रहिवासी असल्याचे व त्याचे वडील मंजूर येथे येऊन स्थायिक झाले होते.तो ईशान्य गडावर छोटेमोठे कंत्राटाचे काम घेऊन आपला उदर निर्वाह करत होता.मात्र तेथेही तो अनेक आजी-माजी संचालकांना नडला असल्याचे ग्रामस्थांत बोलले जात आहे.दरम्यान घटनास्थळी अनेक मागासवर्गीय संघटनांनी व त्यांच्या नेत्यांनी हजेरी लावली असून यात आरोपीवर कारवाईची मागणी केली आहे.त्यामुळे या प्रकरणी हचांगलेच वातावरण पेटणार अशी चिन्हे आहेत.
दरम्यान या घटनेने मंजूर गावात मोठा तणाव निर्माण झाला होता.त्या पार्श्वभूमीवर अ.नगर येथील मानवी हक्क आयोगाचे पोलीस अधीक्षक श्री पठाण यांनी भेट दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दि.२३ ऑगष्ट रोजी सकाळी शांतता समितीची बैठक घेतली आहे.व असामाजिक तत्वांना समज दिली आहे.त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी सहाय्य केले आहे.
दरम्यान यातील मयत हा वारंवार भांडणे करून आपल्या हितशत्रुना नेहमीच आपल्या पत्नीचा वापर करून त्रास देत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.याशिवाय तो जी मंजूर येथील जमीन खंडाने करत होता.तिचा व्यवहार आपल्या मालेगाव येथील जवळच्या नातेवाईकांशी करून त्याचे २७ लाखांचे साठेखत केले होते.व पुन्हा ती जमीन तो स्वतः खंडाने करणार होता.मात्र पैशाअभावी तो व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही.मात्र व्यवहार पूर्ण न झाल्याने ती जमीन गावातील स्थानिक शंकर गावंड व त्यांचे सहकारी पश्चिम गडाचे माजी संचालक साहेबराव सोनवणे या दोघांनी हा ३२ लाखांचा व्यवहार केला होता.व त्याचा ताबा घेण्यासाठी पोलीस व महसुली अधिकारी गेले असताना तेथे मयताने त्यास जमिनीची मोजणी करण्याचा बहाणा केला असल्याचे उघड झाले आहे.त्याचा राग जमीन विकत घेणाऱ्यांच्या मनात होता.त्यावरून मयताने आरोपींवर या कुरबुरीने ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता.व असे प्रकार तो आपल्या पत्नीच्या नावाने वारंवार करून दुरुपयोग करत असल्याचे वारंवार सिद्ध झाल्याने ग्रामस्थांचा त्यावर पराकोटीचा राग होता.त्यातून हि सुमारे दोनशे लोकांच्या उपस्थितीत हि दुर्घटना घडल्याचे ग्रामस्थांत बोलले जात आहे.
दरम्यान मयत जखमीस नजीकच्या ग्रामस्थांनी खाजगी चारचाकीने आधी कोळपेवाडी व त्यानंतर रुग्णवाहिकेतून शिर्डी येथील श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलला येथे भरती केले होते.मात्र तेथे उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने नाशिक येथे खाजगी रुग्णालयात भरती केले होते.मात्र तेथेही प्रतिसाद न मिळल्याने सिव्हिल रुग्णालयात भरती केले होते.तेथे उपचार सुरु असताना त्याचे बुधवार दि.२४ ऑगष्ट रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास निधन झाले आहे.त्यानंतर याघटनेचे गांभीर्य वाढले आहे.मयत हा मूळ सटाणा तालुक्यातील रहिवासी असल्याचे व त्याचे वडील मंजूर येथे येऊन स्थायिक झाले होते.तो ईशान्य गडावर छोटेमोठे कंत्राटाचे काम घेऊन आपला उदर निर्वाह करत होता.मात्र तेथेही तो अनेक आजी-माजी संचालकांना नडला असल्याचे ग्रामस्थांत बोलले जात आहे.दरम्यान घटनास्थळी अनेक मागासवर्गीय संघटनांनी व त्यांच्या नेत्यांनी हजेरी लावली असून यात आरोपीवर कारवाईची मागणी केली आहे.त्यामुळे या प्रकरणी चांगलेच वातावरण पेटणार अशी चिन्हे आहेत.