जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावातील सैनिकी शाळेतील…त्या विद्यार्थ्यांची चिट्ठी सापडली !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश शिवारातील ईशान्य गडावरील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सैनिकी स्कुलचा इयत्ता बारावीतील विद्यार्थी व येवला तालुक्यातील सत्यगाव येथील रहिवासी सौरभ अण्णा सांगळे (वय-१७ वर्ष) यांचा गारदा नदीच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पडून संशयास्पद मृत्यू झाल्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले असताना सदर विद्यार्थ्याने चिट्ठी लिहून आत्महत्या केली असल्याचे उघड झाले आहे.मात्र त्याने आपल्या भ्रमणध्वनी वरील चॅटिंगचा सर्व मजकूर नष्ट केला आहे.त्यामुळे हा मृत्यू नेमका कशाने झाला हा प्रश्न निरुत्तरितच राहिला आहे.

मयत विद्यार्थ्यांच्या पाकिटात एक आई,वडील आणि भाऊ यांना उद्देशून लिहिलेली चिट्ठी आढळली आहे.त्यात त्याने,”उपोरोक्त विषयान्वये वाईट वाटते की,असे म्हणून सुरुवात केली असून मी,”तुमच्या शब्दाच्या बाहेर गेलो, मला माफ करा”, “मम्मी व भावाला जीव लावा”भावाचे स्वप्न पूर्ण करा” असे आवाहन करून पत्र संपवले आहे.व खाली स्वतःची सही केली आहे.मात्र आपल्या भ्रमण ध्वनीवरील चॅटिंगचा सर्व मजकूर नष्ट केला आहे.मात्र त्याने तो नष्ट केला की अन्य कोणी हा प्रश्न निरुत्तरीत आहे.

मयत विद्यार्थ्याचा चार वर्षापूर्वीचा फोटो

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील ईशान्य गडावरील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तत्कालीन सरकारच्या धोरणानुसार सुरु करण्यात आलेल्या सैनिकी शाळेतील बारावीच्या विद्यार्थी हा नजीकच असलेल्या पाण्याने तुडुंब भरलेल्या गारदा नदीच्या कोल्हापूर बंधाऱ्यात मृत अवस्थेत आढळला होता.

सदर विदयार्थी हा नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सत्यगाव येथील रहिवासी असून त्याचे नाव सौरभ अण्णा सांगळे असे आहे.तो ‘गारदा’ नदीतील बंधाऱ्यात मृत अवस्थेत दि.२४ ऑगष्ट रोजी सायंकाली ६ वाजेच्या सुमारास आढळून आला होता.या ठिकाणी कोपरगाव येथील एका ठेकेदाराचे काम सुरू असून त्या ठिकाणी त्यांचा पर्यवेक्षक गुलाब हसन शेख रा.गजानन नगर यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात त्याची खबर दि.२५ ऑगष्ट रोजी उशिरा देऊन हि बाब शाळा व्यवस्थापनाच्या ही बाब लक्षात आणून दिली होती.शाळा व्यवस्थापनाचे प्राचार्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी दौलतराव जाधव यांच्या लक्षात आणून दिली होती.त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याठिकाणी पंचनामा करून सदर विद्यार्थ्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला असता सदर विद्यार्थी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केला होता.

कोपरगाव तालुका पोलिसांनी खबर देणार पर्यवेक्षक गुलाब शेख यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यू नोंद दप्तर क्र.५०/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आंधळे हे करीत असताना सदर ठिकाणी मुलाच्या पाकिटात एक आई,वडील आणि भाऊ यांना उद्देशून लिहिलेली चिट्ठी आढळली आहे.त्यात त्याने,”उपोरोक्त विषयान्वये वाईट वाटते की,असे म्हणून सुरुवात केली असून मी,”तुमच्या शब्दाच्या बाहेर गेलो, मला माफ करा”, “मम्मी व भावाला जीव लावा”भावाचे स्वप्न पूर्ण करा” असे आवाहन करून पत्र संपवले आहे.व खाली स्वतःची सही केली आहे.

दरम्यान त्याचे दप्तर पोलिसांनी जप्त केले असून त्यात त्याने जी वही चिठ्ठी लिहिण्यासाठी वापरली आहे.त्यात जे चिठ्ठी लिहिण्यासाठी पान फाडले आहे.ते हि सापडले असून त्याच्या शेजारी पानात त्याने आपले वसतिगृह सोडल्याची दि.२३ ऑगष्ट रोजी मध्यरात्र १२.०१ वाजेची वेळ पिवळ्या टॅगने नमूद केली आहे.व दोन पानावर प्रेमाचे चिन्ह साकारून आपल्या पेनाच्या सहाय्याने वारंवार म्हणजे तीनदा रेखाटले आहे.त्यामुळे हा प्रेमभंगाचा प्रकार मानला जात आहे.व त्यातून आलेल्या नैराश्येतून व प्रेमभंगातून त्याने आपली जिवन यात्रा संपवली असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

दरम्यान तो वसतिगृहाच्या आडबाजूने भिंतीवर चढून गेला असल्याचे कॅमेऱ्यात चित्रण झालेल्या चलचित्रणात दिसत असल्याचे दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान या शाळेत शाळा व्यवस्थापन मुलांना सुट्टीच्या दिवशीच आपले भ्रमणध्वनी वापरण्यास दिले जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्या दिवशी ‘तो’ कोणाशी बोलला व त्याने शेवटी फेसबुक व व्हॉटस ऍपवर कोणाशी बातचीत केली याचा सर्व मजकूर नष्ट केला आहे.त्यामुळे सदरचा मजकूर हा त्याने नष्ट केला की अन्य कोणी याचे उत्तर पोलीसांना शोधावे लागणार आहे.त्यासाठी सदर मजकूर शोधणे पोलिसांना आव्हान बनले आहे.त्यासाठी पोलिसांनी सायबर शाखेकडे संपर्क साधला आहे.तो आल्यावर ब्रेचक चित्र स्पष्ट होणार आहे.याशिवाय मयत विद्यार्थ्याचा जवळचा ‘देशमुख’ नावाचा ‘मित्र’ याने तो कोणातरी व्यक्तीशी संपर्कात असल्याची माहिती उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे त्याचा जबाब महत्वाचा ठरणार असून त्या नंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.याशिवाय त्याचे हस्ताक्षर हे हस्ताक्षर तज्ज्ञांकडे चौकशी व तपासण्यास पाठवणार असल्याचे पोलीस अधिकांऱ्यानी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close