गुन्हे विषयक
दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या,कोपरगावात गुन्हे दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील तीळवनीं ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले इसम मच्छीन्द्र रंगनाथ पगारे (वय-६३) यांचे घरासमोर आपेगाव रस्त्यालगत विठ्ठल बन्सी पगारे त्यांचे घरासमोर उभी करून ठेवलेली बजाज कंपनीची सुमारे १५ हजार रुपये किमतीची प्लॅटिना कंपणीची दुचाकी (क्रं.एम.एच.१७ सी.ए.२६५७) अज्ञातच चोरट्याने चोरून नेलेले आहे.
या याशिवाय कुंभारी ते धारणगाव गोदावरी नदी पात्रात कुंभारी शिवारातून अज्ञातच चोरट्याने जी.आय पाईप ओ. एफ.सी.केबल एच.डी.ई.डक्ट पाईप चाळीस एम.एम.असा ७ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.याबाबत प्रदीप सुधाकर चव्हाण (वय-२७) रा.यशवंत कॉलनी कोपरगाव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.क्रं.३३२/२०२२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी मच्छीन्द्र रंगनाथ पगारे (वय-३२)रा.तीळवणी यांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.३३४/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.ए.आर.वाखुरे व पोलीस नाईक आर.टी.चव्हाण हे दोघे करीत आहेत.