जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

नगर पोलिसांच्या कारवाईत दुचाकी जप्त ४ आरोपीं जेरबंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

शिर्डी-(प्रतिनिधी)

नगर जिल्हा गुन्हे शोध पथकाने जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दमदार कामगिरी करून आंतरजिल्हा दुचाकी चोरी करणाऱ्या चार चोरट्यांकडून जवळपास १७ दुचाकी अंदाजे किंमत सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या चारही चोरट्यांनी नगरसह औरंगाबाद जिल्ह्यात दुचाकी चोरी केलेल्या असल्याची माहिती पुढे आली असून त्यांच्या वर नगर येथे ४ तर औरंगाबाद शहरात ५ गुन्हे दाखल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली आहे.

“औरंगाबाद येथील अखिल शेख व त्याचा साथीदार चोरीच्या विना नंबर मोपेड वरून औरंगाबाद वरून नगरकडे येत आहे अशी माहिती मिळताच नगर औरंगाबाद रोड हॉटेल सनी पॅलेस जवळ पोलिसांनी वेशांतर करून सापळा लावला असता मोपेड वरून दोन तरुण येताना दिसले पोलिसांचा संशय येताच मोपेडसह हे दोन तरुण पळून जात असताना पोलिसांनी मोठा पाठलाग करून त्यांना मोपेडसह जेरबंद करुन ताब्यात घेतले होते”

दि.५ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील व गुन्हे शाखेचे नगर येथील पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबरी कडून माहिती मिळाली की,”औरंगाबाद येथील अखिल शेख व त्याचा साथीदार चोरीच्या विना नंबर मोपेड वरून औरंगाबाद वरून नगरकडे येत आहे अशी माहिती मिळताच नगर औरंगाबाद रोड हॉटेल सनी पॅलेस जवळ पोलिसांनी वेशांतर करून सापळा लावला असता मोपेड वरून दोन तरुण येताना दिसले पोलिसांचा संशय येताच मोपेडसह हे दोन तरुण पळून जात असताना पोलिसांनी मोठा पाठलाग करून त्यांना मोपेडसह जेरबंद करुन ताब्यात घेतले होते.त्यास ताब्यात घेतल्यावर त्यास पोलिसी खाक्या दाखवला असता त्यांनी त्यांची नावे अखिल शेख खलील (वय-४९ ) रा.भवानीनगर औरंगाबाद व शेख मजूर आनिस अहमद (वय-३१) रा भवानीनगर औरंगाबाद असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्या सहवासात आणखी दोन जण असल्याची पुढे आली त्यांची नावे मुकरम मुसाफा सय्यद नगर औरंगाबाद याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सांगितले की,”नगर शहरात विळद घाटात राहणारा आयुब मुसाफा सय्यद (फिटर) रा.विळद नगर याच्या घरी जाऊन पोलीस पथकाने छापा टाकला असता त्याच्या घरात विक्रीसाठी ठेवलेल्या चोरीच्या १७ वेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकी जप्त करुन ताब्यात घेण्यात आल्या आहेत.या चौघांनाही नगर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

नगर पोलिसांनी आंतर जिल्हा असलेली औरंगाबाद जिल्ह्यात दुचाकी चोरी करणारी टोळी पकडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक अनिल कटके सपोनी दिनकर मुंढे,शिशीर कुमार देशमुख,यांनी व्यक्त केली आहे पोलीस कर्मचारी मनोहर शेजवळ,संदिप घोडके,संदिप पवार,दत्तात्रय गव्हाणे,देवेंद्र शेलार,सखाराम मोटे,ज्ञानेश्वर शिंदे, भिमराज खसे,शंकर चौधरी,संदिप चव्हाण,लक्ष्मण खोकले,दिनेश शिंदे,भानुदास खेडकर,राहुल द्वारके,विनोद मासाळकर,योगेश सातपुते,मेघराज कोल्हे,महादेव निमसे,संभाजी कोतकर,संजय काळे.या पोलिसांनी कारवाईत भाग घेतला होता पोलिसांच्या ह्या दमदार कारवाईमुळे जिल्ह्यात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close