जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात अल्पबचत गटांना कर्ज वाटप संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)

भारत देशाच्या अमृत महोउत्सवी संवत्सर हिरकणी महिला बचत गटातर्फे गोदावरी परजणे तालुका दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांचे अध्यक्षतेखाली कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती आहे.हिरकणी गटाच्या अध्यक्षा मीरा शेटे यांनी दिली आहे.

संवत्सर येथील ग्रामसंघामार्फत बचत गटांना १५ लाख बँके मार्फत कर्ज वाटप करून प्रत्येकी ४० हजार कर्ज देवून संवत्सर ५२ बचत गट तयार करून एकूण ६०० महिलांना रोजगार प्राप्त झाला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

सदर प्रसंगी राजेश परजणे यांनी म्हटले आहे की,”शालिनीताई विखे यांनी ग्रामीण महिलांना रोजगार मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत अनेक बचत गट तयार करून अर्थ साह्य मदत केली त्यांनी आपण आयुर्वेदिक पालेभाज्या लावून उत्पन्न वाढवावे.अंगणवाडी जिल्हा परिषद प्राथ शाळा यांनी बचत गटामार्फत बियाने घेवून शालेय पोषण आहारात वापर करावा तसेच बचत गटासाठी मदत लागेल प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.

या प्रसंगी वाघीरे कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे,संवत्सर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,दिलीप ढेपले , लक्ष्मणराव साबळे,मधुकर शेटे,ग्रामविकास अधिकारी अहिरे,बचत गटातील महिला,ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close