गुन्हे विषयक
महिलेच्या दागिन्यांची चोरी,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथील रहिवासी असलेली महिला श्रीमती विमलबाई आप्पासाहेब शिंदे (वय-७०) हि राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव-चास-हंडेवाडी बस मधून प्रवास करत असताना अज्ञातच चोरट्याने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची ६० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरून नेली असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
फिर्यादी महिला आपले काम आटोपून दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाल्या असता त्या राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव बस आगारात आल्या होत्या.व त्या दुपारच्या सुमारास ४.३० वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी कोपरगाव हंडेवाडी या बसमध्ये बसल्या असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची अडीच तोळ्याची पोत काही कळायच्या आत लंपास केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला हि मळेगाव थडी येथील रहिवासी असून त्या आपल्या काही कामासाठी दि.०६ जुलै रोजी आल्या होत्या त्या आपले काम आटोपून दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाल्या असता त्या राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव बस आगारात आल्या होत्या.व त्या दुपारच्या सुमारास ४.३० वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी कोपरगाव हंडेवाडी या बसमध्ये बसल्या असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची अडीच तोळ्याची पोत काही कळायच्या आत लंपास केली आहे.हि बाब त्यांना उशिरा लक्षात आली.त्यांनी या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान कोपरगाव बस स्थानक परिसरात चोरट्यानी आपली हात की सफाई दाखविण्यास प्रारंभ केला असून या पूर्वीही बस स्थानकाच्या समोर उभ्या असलेल्या एका जीप मधून मोठा ऐवज चोरीस गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.त्यातील आरोपी अद्याप सापडलेला नसताना चोरट्यानी हे आव्हान उभे केले आहे.
घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले पोलीस नाईक ए. एम.दारकुंडे आदींनी भेट दिली आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२१२/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ या कलमा प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.दारकुंडे हे करीत आहेत.