जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अवैध गोळीबार,महिला ठार,शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव खुर्द ग्रामपंचायत हद्दीत आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास एका आरोपी विशाल सुनील भालेराव या चुलत दिराकडून संशयित रित्या गावठी कट्यातून सुटलेल्या गोळीतून महिला सुनीता संजय भालेराव (वय-४५) हि जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना आज उघड झाली आहे.त्यामुळे पोहेगाव सह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आरोपी विशाल भालेराव हा गवंडी काम करत असून त्याचे आपले चुलत भाऊ आणि भावजय यांचेकडे जाणे येणे होते.आज सकाळी अज्ञात ठिकाणाकडून त्याने एक गावठी कट्टा आणला होता.व तो घरातील उपस्थितांना कौतुकाने दाखवत असताना त्याच्याकडून अनावधानाने त्यातील गोळी सुटली असे मानले जात आहे.त्यातून सुटलेल्या गोळीने तेथे उपस्थित असलेल्या भावजयीच्या डोक्यातून आरपार गेली असून सदर महिला जागेवर कोसळली आहे.आरोपीस पोलिसानी जेरबंद केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,विशाल भालेराव व सुनीता संजय भालेराव हे चुलत भाऊ असून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे मागे रहिवासी आहेत.त्यांचे चुलत दीर भावजय असे नाते आहे.सदर आरोपी विशाल भालेराव हा गवंडी काम करत असून त्याचे आपले चुलत भाऊ आणि भावजय यांचेकडे जाणे येणे होते.आज सकाळी अज्ञात ठिकाणाकडून त्याने एक गावठी कट्टा आणला होता.व तो घरातील उपस्थितांना कौतुकाने दाखवत असताना त्याच्याकडून अनावधानाने त्यातील गोळी सुटली असे मानले जात आहे.त्यातून सुटलेल्या गोळीने तेथे उपस्थित असलेल्या भावजयीच्या डोक्यातून आरपार गेली असून सदर महिला जागेवर कोसळली आहे.तिला शिर्डी येथे उपचारार्थ दाखल केले असता दुपारी सदर महिलेचे निधन झाले आहे.

श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी यांनी घटनास्थळी पोलीस भेट दिली आहे.

दरम्यान या घटनेने आरोपी विशाल भालेराव व सिद्धार्थ भालेराव,अमोल भालेराव आदीनीं पुरावा नष्ट करण्यासाठी सदर कट्टा व गोळ्या घेऊन जागेवरून फरार झाले होते.मात्र त्याचा शोध घेऊन त्यास पोलिसानी गजाआड केले आहे.त्यासाठी पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील.पो.कॉ.नितीन सानप,रमेश शेख,बाळकृष्ण दळवी,आदींनी सहकार्य केलं आहे.

दरम्यान या घटनेची शिर्डी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपी विरुद्ध फिर्यादी महिलेचा मुलगा कल्पेश संजय भालेराव याने गुन्हा क्रं. ३२७/२०२२ भा.द.वि.कलम ३०४,२०१,३४ प्रमाणे आरोपी विशाल सुनील भालेराव,सिद्धार्थ भाऊसाहेब भालेराव,अमोल दिनकर भालेराव सर्व रा.पोहेगाव आदी विरुद्ध दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close