कोपरगाव तालुका
पंचवीस लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपीचा जमीन फेटाळला

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेकडून ५५ हजारांचे कर्ज घेऊन ते थकवल्याने संस्थेने सहकार न्यायालयात दावा करून साकुरी येथील थकबाकीदार बाबासाहेब बळवंत बनसोडे याच्या विरुद्ध जप्ती आदेश मिळवून त्याच्या स्थावर मालमत्तेची जप्ती केल्याचा राग मनात धरून आरोपीने माहिती अधिकाराचा दुरुपयोग करून संस्थेचे वसुली व विक्री अधिकारी मारुती लिंभुरे यांना दूरध्वनी करून २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती या आरोपी विरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने या आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जमीन मागितला होता मात्र न्यायालयाने नुकताच फेटाळून लावला असल्याची माहिती सरकारी वकील अशोक वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
या बाबत फिर्यादी भालेराव याने या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात ८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता.त्या नंतर आरोपीने अटकपूर्व जमीन मिळवला होता.मात्र सरकारी पक्षाचे वकील अशोक वहाडणे यांनी या प्रकरणी आरोपीने यापूर्वी केलेले उद्योग न्यायालयाच्या निदर्शनात आणताना साकुरी ग्रामपंचायतीकडे केलेले विविध अर्ज,ग्रामपंचायत ठरावाची नक्कल,भावाच्या जातीच्या दाखल्यात बदल करण्यासाठी दिलेल्या त्रासाची नक्कल, खंडणीची ध्वनिमुद्रण क्लिप व अन्य सरकारी अधिकाऱ्यांना वेळोवेळी दिलेला त्रास न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्यावर कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपी बाबासाहेब बनसोडे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
सदर चे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थे कडून साकुरी ता.राहाता येथील कर्जदार बाबासाहेब बनसोडे याने ५५ हजारांचे कर्ज घेतले होते.सदरचे कर्ज मुदतीत भरले नाही म्हणून संस्थेने सहकार न्यायालयात या थकबाकीदारा विरुद्ध दावा ठोकला होता.त्यात तडजोड होऊन आरोपीने २ हजार ५०० रुपये भरण्याचे कबूल केले होते.मात्र ते देण्यास टाळाटाळ केली होती.कर्ज वसुलीसाठी वसुली व विक्री अधिकारी मारुती लिंभुरे यांना वसुली अधिकारी म्हणून नेमले होते.त्या साठी त्यांनी रीतसर नोटिसा बजावल्या होत्या मात्र तरीही कर्जदाराने त्याला दाद दिली नव्हती.म्हणून संस्थेने या थकीत कर्जदाराविरुद्ध स्थावर मालमत्तेची जप्ती काढली होती.याचा राग मनात धरून आरोपी याने संस्थेविरुद्ध माहिती अधिकाराचा वापर करून रक्कम उकळण्यासाठी त्रास देण्यास प्रारंभ केला होता.
२५ जानेवारी रोजी कर्जाच्या वसुली साठी फिर्यादी रवींद्र गिरीजा भालेराव हे कर्जदार यांचे घरी गेले असता तो मिळून आला नाही.त्यावेळी वसुली अधिकारी भालेराव यांनी त्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यास कर्ज भरण्यास सांगितले होते.व संस्थेविरुद्ध खोटेनाटे अर्ज करू नका फार तर संस्थेच्या अध्यक्षांना भेटून व्याजाचा सूट मिळवून घ्या असे सांगितले असता त्याने विक्री व वसुली अधिकारी हे कोपरगावात फिरत असताना त्यांना दूरध्वनी करून,”आपण संस्थेविरुद्ध अर्ज करणार नाही मात्र आपल्याला २५ लाख रुपयांची रक्कम द्या”अशी मागणी केली होती.त्याचे रेकॉर्डिंग वसुली अधिकारी यांनी करून त्याचा पुरावा तयार केला होता.
दरम्यान या बाबत फिर्यादी भालेराव याने या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात ८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता.त्या नंतर आरोपीने अटकपूर्व जमीन मिळवला होता.मात्र सरकारी पक्षाचे वकील अशोक वहाडणे यांनी या प्रकरणी आरोपीने यापूर्वी केलेले उद्योग न्यायालयाच्या निदर्शनात आणताना साकुरी ग्रामपंचायतीकडे केलेले विविध अर्ज,ग्रामपंचायत ठरावाची नक्कल,भावाच्या जातीच्या दाखल्यात बदल करण्यासाठी दिलेल्या त्रासाची नक्कल, खंडणीची ध्वनिमुद्रण क्लिप व अन्य सरकारी अधिकाऱ्यांना वेळोवेळी दिलेला त्रास न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्यावर कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपी बाबासाहेब बनसोडे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.