गुन्हे विषयक
महावितरण कंपनीची चोरी,कोपरगावात गुन्हा दाखल

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव शिवारातील येसगाव रस्त्यालगत ‘शंकर बाग’ येथील विद्युत रोहित्रावरील पोल क्रमांक ९ वरील अल्युमिनियमची सुमारे १२ हजार रुपये किमतीची विद्युत वाहक तार अज्ञातच चोरट्याने चोरून नेली असल्याची फिर्याद तेथील तारतंत्री संतोष दशरथ पवार (वय-४२) रा.साई सिटी यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
ब्राम्हणगाव शिवारात येसगाव शिवारात शंकर बाग विद्युत रोहित्रा जवळ पोल क्रं.०९ असून त्यावरील सुमारे १२ हजार रुपये किमतीची सहाशे मीटर विद्युत वाहक तार अज्ञात चोरट्याने आपल्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने चोरून नेली आहे.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी हे साई सिटी,कोपरगाव येथील रहिवासी असून ते ब्राम्हणगाव येथील महावितरण कंपनीत तारतंत्री म्हणून सेवेत आहेत.त्यांच्या ब्राम्हणगाव शिवारात येसगाव शिवारात शंकर बाग विद्युत रोहित्रा जवळ पोल क्रं.०९ असून त्यावरील सुमारे १२ हजार रुपये किमतीची सहाशे मीटर विद्युत वाहक तार अज्ञात चोरट्याने आपल्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने चोरून नेली आहे.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी चौकशी अधिकारी आंधळे यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२३०/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ए.एम.आंधळे हे करीत आहेत.