गुन्हे विषयक
दोन संशयित आरोपी पकडले,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्गाचे पुलाजवळ दोन इसम चोरी करण्याचे उद्देशाने संशयितरित्या आढळून आल्याने आरोपी नवनाथ लक्ष्मण भागवत (वय-२३), लहानु कारभारी भागवत (वय-२९) दोघे रा.गवंडगाव ता.येवला यांच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विलास नामदेव कोकाटे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांची गस्त सुरु असताना दि.१५ जून रोजी रात्री ११.५० वाजेच्या मध्यरात्रीच्या सुमारास दोन संशयित चोरटे भोजडे हद्दीत संशयित स्थितीत आढळून आले होते.त्यांच्यावर पोलिसांची नजर गेली असता त्यांच्या हालचाली संशयित आढळल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे विना क्रमांकाची असलेली काळ्या रंगाची टी.व्ही.एस.सुझुकी हि दुचाकी सह त्यांना ताब्यात घेतले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,वर्तमानात राज्याच्या महात्वांकांशी असलेला ५६ हजार कोटी खर्चाच्या समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्यात आले आहे.मात्र चोरट्यांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट वाढला आहे.नुकताच चांदेकसारे हद्दीतून संबंधित ठेकेदाराचा बारा लाख रुपये किंमतीचा एक रोड रोलर चोरट्यानी चोरुन नेला होता.तो नुकताच चोरट्यासह औरंगाबाद जवळ पकडला आहे.या खेरीज इंधन चोरी,स्टील चोरी आदी चोऱ्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनावर याकामी ताण आलेला असताना त्यांनी आपली गस्त वाढवली आहे.
दरम्यान हि गस्त सुरु असताना दि.१५ जून रोजी रात्री ११.५० वाजेच्या मध्यरात्रीच्या सुमारास दोन संशयित चोरटे भोजडे हद्दीत संशयित स्थितीत आढळून आले होते.त्यांच्यावर पोलिसांची नजर गेली असता त्यांच्या हालचाली संशयित आढळल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे विना क्रमांकाची असलेली काळ्या रंगाची टी.व्ही.एस.सुझुकी हि दुचाकी सह त्यांना ताब्यात घेतले होते.
त्यांच्या विरुध्द कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.नोंद क्रं.२२३/२०२२ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम-१२२ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.