गुन्हे विषयक
अवैध गोवंश वहातूक,कोपरगावात गुन्हा दाखल,३.५० लाखांचा ऐवज जप्त

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर-कासली रस्त्यावर दि.०८ जूनच्या सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास एका वाहनातून अवैध गोवंश वाहतूक होणार असल्याची खबर मिळाल्या नुसार कोपरगाव शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३.५० लाखांचा अवैज असलेला एक अशोक लेलंड ट्रक सह एक कालवडी सह पाच विविध रंगाच्या गाई असा अवैज जप्त केला असून आरोपी आश्पाक इसाक सय्यद (वय-३६) रा.ज्ञानेश्वरनगर याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यासाठी पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दोन्ही संकल्पित छायाचित्र.
जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ ‘ऋग्वेद’ आहे.त्यात गाईचे स्थान उच्च आहे.मात्र अलीकडील काळात याबाबीकडे दुर्लक्ष झाले आहे.मात्र गत भाजपच्या राजवटीत गोवंश हत्या बंद केली आहे हि समाधानकारक बाब आहे.मात्र बऱ्याच वेळा त्याची अंमलबजावणी होत नाही.त्यामुळे गोवंश हत्या करणाऱ्या प्रवृत्तीचे फावते अशीच घटना संवत्सर-कासली रस्त्यावर घडली असून पोलिसांनी एक टेम्पो सह पाच गायी जप्त केल्या आहे.
हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे,संपन्नतेचे,मांगल्याचे प्रतीक आहे.हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे.गोमूत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे. गोमय(गाईचे शेण),गोमूत्र (गाईचे मूत्र),गाईचे दूध,दही,तूप यांच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात.जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ ‘ऋग्वेद’ आहे.त्यात गाईचे स्थान उच्च आहे.मात्र अलीकडील काळात याबाबीकडे दुर्लक्ष झाले आहे.मात्र गत भाजपच्या राजवटीत गोवंश हत्या बंद केली आहे हि समाधानकारक बाब आहे.मात्र बऱ्याच वेळा त्याची अंमलबजावणी होत नाही.त्यामुळे गोवंश हत्या करणाऱ्या प्रवृत्तीचे फावते अशीच घटना संवत्सर-कासली रस्त्यावर घडली आहे. कोपरगाव शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त खबरीनुसार त्यांनी संवत्सर-कासली रस्त्यावर दि.०८ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास एक अवैध गोवंश वाहतूक करणारा ट्रक जाणार असल्याची पक्की खबर मिळाली होती.त्यानुसार शहर पोलिसांनी सदर रस्त्यावर सापळा लावला असता त्या ठिकाणाहून एक अशोक लेलंड कंपनीची ट्रक जाताना दिसला असता त्यांनी त्यास थांबण्याचा इशारा दिला असता पोलिसांनी त्याची तपासणी केली असता मिळालेली खबर बरोबर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान सदर ट्रक मध्ये गोवंश जातीच्या पाच गायी त्यात एक १५ हजार रुपये किंमतीची गावरान जातीची काळ्या रंगाची गाय,एक २० हजार रुपये किमतीची पांढरा रंग व काळे ठिपके असलेली बिगर शिंगाची गाय,एक २५ हजार रुपये किमतीची पांढरा रंग व काळे ठिपके असलेली दोन उभे शिंगे असलेली गाय,एक १५ हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची कालवड,व एक २५ हजार किमतीची काळा पांढरा रंग असलेली बिगर शिंगाची गाय अशा चार गायी एक कालवड व एक ०२ लाख ५० हजार किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा लाल रंगाचा चार चाकी टेंम्पो (क्रं.एम.एच.१६ ए.वाय.८१४५) असा सुमारे ०३ लाख ५० हजारांचा अवैज जप्त केला आहे.
सदर गायी या तालुक्यातील वेस येथून भरून शिरसगाव येथे खाली करण्यासाठी दाटीवाटीने भरून जात असल्याचें निष्पन्न झाले आहे.त्यांना विविध ठिकाणी जखमा झालेल्या आढळून आल्या आहेत.त्या विक्रीबाबत कोणताही पुरावा त्यांना पोलिसांना दाखवता आला नाही.
सदर गायी या कोकमठाण येथील गोकुलधाम गोशाळेत पशुवैद्यकीय तपासणी नंतर सांभाळण्यासाठी रवानगी केली आहे.या कामी पोलीस ठाण्याचे प्रमुख वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड.पोलीस नाईक शेवाळे,पो.कॉ.शेवाळे यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.
कोपरगाव शहर पोलिस कॉ.जालिंदर पुंजाजी तमनर यांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१६०/२०२२ भा.द.वि.कलम-४२९,व महाराष्ट्र पशु क्रूरता अधिनियम कलम ११(अ)(५)(ई)(फ)महाराष्ट्र पशु वाहतूक अधिनियम कलम-४७ मोटार वाहन कायदा कलम १८३/१७७ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलिसना निरीक्षक दिसेल यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.